कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात ८ मे रोजी ६२९ पॉजिटीव्ह, ११ मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६९१३
Sat, 8 May 2021

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे.आज ८ मे ( शनिवार ) रोजी तब्बल ६२९ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ८४१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात ११ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ४३ हजार ९८६ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ३६ हजार ४९ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १०२४ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६९१३ झाली आहे.