कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात २ मे रोजी ४८६ पॉजिटीव्ह, ९ मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६८८१
May 2, 2021, 19:27 IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे.आज २ मे ( रविवार) रोजी तब्बल ४८६ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ७१५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात ९ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ३९ हजार ५०१ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ३१ हजार ६७० रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ९५० रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६८८१ झाली आहे.