कोरोनाचा विस्फोट : उस्मानाबाद जिल्ह्यात १२ एप्रिल रोजी ६८० पॉजिटीव्ह, पाच मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या ४५८६
Mon, 12 Apr 2021

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज १२ एप्रिल ( सोमवार ) रोजी तब्बल ६८० जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर २८२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात पाच कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ४५८६ झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत २५ हजार ८७७ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी २० हजार ६६० रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ६३६ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.