कोरोनाचा विस्फोट : उस्मानाबाद जिल्ह्यात ११ एप्रिल रोजी ५७३ पॉजिटीव्ह, तीन मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या ४१८८
Updated: Apr 11, 2021, 22:11 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज ११ एप्रिल ( रविवार ) रोजी तब्बल ५७३ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर २८३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात तीन कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ४१८८ झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत २५ हजार १९७ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी २० हजार ३७८ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ६३१ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
गावनिहाय सविस्तर रिपोर्ट