कोरोनाचा विस्फोट : उस्मानाबाद जिल्ह्यात १ एप्रिल रोजी २८३ रुग्णाची भर, चार मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या १९७०
Apr 1, 2021, 19:35 IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात गुरुवार दि.१ एप्रिल रोजी २८३ नव्या कोरोना रुग्णाची भर पडली तर १६९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १९७० झाली आहे, तसेच चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्यामुळे नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत २० हजार ८१८ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी १८ हजार २४८ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ६०० रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर रिपोर्ट पाहा