कोरोनाचा विस्फोट : उस्मानाबाद जिल्ह्यात ३१ मार्च रोजी २५३ रुग्णाची भर, तीन मृत्यू 

जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या १८६०
 
कोरोनाचा विस्फोट : उस्मानाबाद जिल्ह्यात ३१ मार्च रोजी २५३ रुग्णाची भर, तीन मृत्यू

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात बुधवार  दि.३१ मार्च रोजी २४३ नव्या  कोरोना रुग्णाची भर पडली तर ८७ रुग्ण बरे होऊन घरी परतले.  त्यामुळे जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १८६० झाली आहे, तसेच  तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्यामुळे नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत २० हजार ५३५ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी १८ हजार ७९ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ५९६ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर रिपोर्ट पाहा  

From around the web