कोरोनाचा विस्फोट : उस्मानाबाद जिल्ह्यात ३० मार्च रोजी २४२ रुग्णाची भर
जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या १६९७
Updated: Mar 30, 2021, 20:34 IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवार दि.३० मार्च रोजी २४२ नव्या कोरोना रुग्णाची भर पडली तर १७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १६९७ झाली आहे, कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्यामुळे नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत २० हजार २८२ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी १७ हजार ९९२ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ५९३ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर रिपोर्ट पाहा