कोरोनाचा विस्फोट : उस्मानाबाद जिल्ह्यात २८ मार्च रोजी १८४ रुग्णाची भर
जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या १५३४
Mar 28, 2021, 18:43 IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात रविवार दि.२८ मार्च रोजी कोरोनाचा पुन्हा एकदा विस्फोट झाला. एकाच दिवशी १८४ नव्या कोरोना रुग्णाची भर पडली तर १३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १५३४ झाली आहे, जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस चिंताग्रस्त होत चालली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १९ हजार ८०१ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी १७ हजार ६७५ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ५९२ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर रिपोर्ट पाहा