कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २२ मे रोजी ५७७ पॉजिटीव्ह, ११ मृत्यू 

कोरोना रुग्ण बरे होण्याचे ८८.७६ तर ‌ मृत्यूचे २.२५ प्रमाण टक्के
 
corona

उस्मानाबाद -  कोरोना विषाणूंची ५७७ जणांना बाधा झाली आहे. तर आज ४७७ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ८८.७६ टक्के आहे. तर ११ व आजपर्यंत १ हजार १७० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मृत्यू पावलेल्या रुग्णांचे प्रमाण २.२५ टक्के आहे. तसेच ४६ हजार १३६ रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत.


जिल्ह्यातील ३३६ जणांची आरटीपीसीआर तपासणी करण्यासाठी स्वॅब येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात असणाऱ्या कोविड विषाणू तपासणी प्रयोगशाळा येथे पाठविण्यात आले होते. तर ४४२ जणांचा अहवाल प्राप्त झाला असून ९४ जण पॉझिटीव्ह व निगेटिव्ह ३०८ जणांचा तर संदिग्ध २० व ३३६ जणांचा अहवाल प्रलंबित आहे. तसेच ३ हजार ३८७ जणांची रॅपिड ॲन्टिजेन तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ४८३ पॉझिटीव्ह व २ हजार ९०४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच जिल्हाभरातील विविध रुग्णालयात ४ हजार ६७१ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत २ लाख ७७ हजार ५६ जणांची स्वॅब व रॅपिड ॲन्टिजेन तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ५१ हजार ९७७ जणांना कोरोना विषाणूंची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून पॉझिटीव रुग्णांचे प्रमाण १८.७६ टक्के आहे. 

आज आलेल्या अहवालानुसार स्वॅब, ॲन्टिजेन व एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे - उस्मानाबाद - ३३, ८७ (१२०), तुळजापूर - १० - ११७ (१२७), उमरगा- ६ - ४३ (४९), लोहारा- १५ - ३० (४५), कळंब- १६ - ४९ (६५), वाशी- ३  - ७४ (७७), भूम- ६ - ४७ (५३) व परंडा- ५ - ३६ (४१) अशी एकूण ९४ - ४८३ (५७७) रुग्ण संख्या आहे.


उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५१ हजार ९७७ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ४६ हजार १३६  रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ११७० रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ४६७१ झाली आहे .

From around the web