कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २० मे रोजी ५३४ पॉजिटीव्ह, ११ मृत्यू
May 20, 2021, 20:41 IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज २० मे ( गुरुवार ) रोजी तब्बल ५३४ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ७९९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात ११ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या घटली आहे पण मृत्युदर कायम आहे. मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे आव्हान आरोग्य विभागापुढे आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५० हजार ८८६ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ४५ हजार ३ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ११५१ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ४७३२ झाली आहे .