कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २१ मे रोजी ५१४ पॉजिटीव्ह, ८ मृत्यू
Updated: May 21, 2021, 21:07 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज २१ मे ( शुक्रवार ) रोजी तब्बल ५१४ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ६७० रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात ८ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या घटली आहे पण मृत्युदर कायम आहे. मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे आव्हान आरोग्य विभागापुढे आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५१ हजार ४०० रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ४५ हजार ६५९ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ११५९ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ४५८२ झाली आहे .