कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २७ मे रोजी ३५६ पॉजिटीव्ह, ८ मृत्यू 

कोरोना रुग्ण बरे होण्याचे ९०. ४९  टक्के तर ‌मृत्यूचे २.२४ प्रमाण टक्के
 
corona

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज २७ मे ( गुरुवार ) रोजी तब्बल ३५६ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ५४३  रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात ८ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 


उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या घटली असून, मृत्यू संख्येतही घट  झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी थोडासा सुस्कारा सोडला आहे. 


उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५३ हजार ८४६ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ४८ हजार ७२८ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १२०९ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ३९०९ झाली आहे .

From around the web