कोरोना : १९ डिसेंबर रोजी नव्या २० रुग्णाची भर
Updated: Dec 19, 2020, 20:23 IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवार दि. १९ डिसेंबर रोजी नव्या २० रुग्णाची नोंद झाली तर ८ जण बरे होवून घरी परतले. जिल्हयात १५६ ऍक्टिव्ह रुग्ण उरले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने कमी होत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार १५१ रुग्ण आढळून आले असून, पैकी १५ हजार ४३४ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या १५६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोनाने ५६१ जणांचा बळी घेतला आहे.