श्री श्री रविशंकर विद्यामंदिर शाळेचे बांधकाम बेकायदेशीर 

धाराशिव शहर पोलीस स्टेशनमध्ये अध्यक्ष, सचिवावर गुन्हा दाखल 
 
s

धाराशिव -  शहरातील जाधववाडी रोडवरील साईराम नगरमध्ये श्री श्री  रविशंकर विद्यामंदिर शाळेचे बांधकाम विनापरवाना करण्यात आल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले असून, याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष आणि सचिवावर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. 

धाराशिव  शहरातील जाधववाडी रोडवरील साईराम नगरमध्ये श्री श्री  रविशंकर विद्यामंदिर शाळेचे बांधकाम करताना संस्थेचे अध्यक्ष आणि सचिवाने नगर पालिकेची परवनगी न घेता बेकायशीर बांधकाम केल्याची तक्रार सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी नगर पालिका मुख्याधिकारी यांच्याकडे केली होती. 

या तक्रार अर्जाची दखल घेऊन, पालिका प्रशासनाने संस्थेला नोटीस बजावली होती. मात्र संस्थेने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यानंतर याप्रकरणी पालिकेचे रचना सहाय्यक मुदस्सर उस्मान सय्यद यांनी शहर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली असून, याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष, सचिव यांच्याविरुद्ध भादंवि कलम ५३ ( ७ ) नुसार गुन्हा दाखल  कऱण्यात आला आहे. 

जाधववाडी रोडवर बेकायदेशीर बांधकाम करून, नगर पालिकेचा कर चुकवेगिरी करणाऱ्या श्री श्री  रविशंकर विद्यामंदिर शाळेचे अनाधिकृत बांधकाम पालिका पाडणार का ? याकडे लक्ष  वेधले आहे. विद्यार्थांकडून भरमसाठ फी घेऊन , कर चुकवेगिरी करणाऱ्या श्री श्री  रविशंकर विद्या मंदिर शाळेबाबत पालकांच्या अनेक तक्रारी आहेत.

s

From around the web