दिलासा : उस्मानाबाद जिल्ह्यात २८ मे रोजी २८८ कोरोना पॉजिटीव्ह, ८ मृत्यू 

कोरोना रुग्ण बरे होण्याचे ९०. ९१ टक्के तर ‌मृत्यूचे २.२४ प्रमाण टक्के
 
corona

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज २८ मे (शुक्रवार  ) रोजी तब्बल २८८ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ३९८  रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात ८ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या घटली असून, त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी थोडासा सुस्कारा सोडला आहे. 


उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५४ हजार १३४ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ४९ हजार २१६ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १२१७ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ३७०१  झाली आहे .

From around the web