दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंती तारखेबाबत उस्मानाबादेत संभ्रम 

 
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंती तारखेबाबत उस्मानाबादेत संभ्रम

उस्मानाबाद  - मराठी वृत्तपत्राचे जनक,दर्पणकार आणि समाज सुधारक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी  ६ जानेवारी १८३२  रोजी दर्पण नावाचे पहिले मराठी पाक्षिक  सुरु केले होते. खरं तर हा दर्पण दिन, पण काही पत्रकार संघटना याच दिवशी जांभेकरांची जयंती  साजरी करतात. शासन परिपत्रकामध्ये जांभेकर यांच्या जयंतीची तारीख १६ फेब्रुवारी आहे, तर उस्मानाबाद जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेमध्ये आज २० फेब्रुवारी रोजी जांभेकरांची जयंती केल्याने जयंती तारखेबाबत पत्रकारांमध्ये संभ्रम  निर्माण झाला आहे. 

हेच ते शासन परिपत्रक 


जिल्हा माहिती कार्यालयात जांभेकर जयंती साजरी 

मराठी वृत्तपत्राचे जनक,दर्पणकार आणि समाज सुधारक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 209 व्या जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील सिध्देश्वर कोंपले,शशिकांत पवार, श्रीकांत देशमुख तसेच इतर कार्यातील वैभव लांडगे,माधव पाटील आदी उपस्थित होते.जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे मात्र अनुपस्थित होते. 

जिल्हाधिकारी कार्यालयात बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त अभिवादन

मराठी वृत्तपत्राचे जनक,दर्पणकार आणि समाज सुधारक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 209 व्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,  नायब तहसीलदार संतोष पाटील, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक कुलकर्णी,पुरवठा निरीक्षक आगलावे,अव्वल कारकून माधव मैंदपवाड, ज्योतीराम देवकर, नरसिंह ढवळे, छगन नागरगोजे आदींची प्रमुख उपस्थिती होती


जिल्हा परिषदेमध्ये बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी


पत्रकारितेचे जनक,आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उस्मानाबाद जिल्हा परिषदेत साजरी करण्यात आली.यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे शिक्षणाधिकारी (प्रा.) डॉ.ए.बी.मोहरे यांनी पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात केला. बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त  विस्तार अधिकारी (शिक्षण) माळी यांनी यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये उपस्थितांसमोर त्यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला.  
  
 यावेळी विस्तार अधिकारी (शिक्षण) वाघमारे,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी पिंपळे, बांधकाम विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी नागनाथ कुंभार, सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी देशपांडे, आरोग्य विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी गिरी, श्रीमती कुलकर्णी, सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सहाय्यक एस.एफ.पटेल, वरिष्ठ सहाय्यक (भांडार) मधुकर कांबळे, कनिष्ठ सहाय्यक के.डी. शेख यांच्‍यासह विभाग प्रमुख वरिष्ठ अधिकारी - कर्मचारी जयंती कार्यक्रमास उपस्थित होते.
 

From around the web