नळदुर्ग ते अक्कलकोट रस्त्याचे काम पूर्ण करा

शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
 
s

नळदुर्ग -  तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग ते अक्कलकोट राज्य महामार्ग क्रमांक 652 नळदुर्ग हद्दीतील प्रलंबित रस्त्याचे काम प्रशासनाने पुर्ण करावेत अन्यथा नळदुर्ग हद्दीतील शेतकऱ्यांच्या वतिने प्रशासनाच्या विरोधात उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनात द्ववारे  शेतकऱ्यांने दिला आहे .


नळदुर्ग ते अक्कलकोट या राज्य महामार्गावरून प्रवासी वर्गांची मोठी वर्दळ असते   महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे तुळजापूर येथील दर्शन उरकून नळदुर्ग अक्कलकोट महामार्गावरून अक्कलकोट कडे स्वामी समर्थाचे दर्शन घेण्यासाठी तसेच ऐतिहासिक नळदुर्ग चा किल्ला पाहण्यासाठी राज्यातील व परराज्यातील प्रवाशी याच रोडने ये - जा करतात . काही शेतकरी व प्रशासनाच्या वादात  जागोजागी रस्त्याचे काम अर्धवट आहे .तसेच नळदुर्ग ते अक्कलकोट राज्य महामार्ग क्र 652 रस्त्याचे नळदुर्ग हद्दीतील अर्धवट असलेले काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे नळदुर्ग येथील शेतकरी अब्दुल गणी शेख या शेतकऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे . 

पुढे निवेदनात म्हटले आहे की , नळदुर्ग ते अक्कलकोट राज्य महामार्ग क्रमांक 652 नळदुर्ग हद्दीतील गाव नकाशा प्रमाणे अर्धवट असलेल्या रस्त्याचे काम संबंधित यंत्रणेने पूर्ण करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी याच्याकडे केली आहे . 

या रस्त्यावरून दैनंदिन कामकाजाकरिता गुळहळी , निलेगाव , देवसिंगा ( नळ ) , शहापूर , गुजनुर , दहिटना , वागदरी , येडोळा , पाटील तांडा खुदावाडी येथील शाळकरी विद्यार्थी - विद्यार्थिनी , व्यापारी , शेतकरी , राज्य व परराज्यातील भाविक भक्तासह नागरीकाना नळदुर्ग येथे ये - जा करावे लागते . या भागातील गरोदर महिलांना दवाखान्यासाठी उपचारा करिता नळदुर्ग येथेच यावे लागते . या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवासी वर्गांना रस्त्यावरून  ये जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे . दिवसेंदिवस या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण देखील वाढत आहेत . 

नळदुर्ग अक्कलकोट राज्य महामार्ग रस्ता गाव नकाशा मध्ये नळदुर्ग हद्दीतील रोड ची लांबी व रुंदी जेवढी आहे त्याप्रमाणे रस्त्याचे अर्धवट असलेले काम पुर्ण करावेत याची संबंधित प्रशासनाने नोंद घ्यावी अन्यथा  नळदुर्ग हद्दीतील शेतकऱ्यांच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात उपोषण करणार असल्याचा इशारा नळदुर्ग येथील शेतकरी अब्दुल गणी शेख यानी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहेत जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनावर अब्दुल गणी शेख व अब्दुल रहीम सय्यद या शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत. सदर निवेदनाची प्रत रस्ते व वाहतूक केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी , मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे , पोलीस अधीक्षक उस्मानाबाद याना निवेदन देण्यात आले आहे .

s

From around the web