उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील कोरोना मदत केंद्राच्या कामकाजास सुरूवात

हेल्पलाईन 24 तास सुरू राहणार : कौस्तुभ दिवेगावकर
 
उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील कोरोना मदत केंद्राच्या कामकाजास सुरूवात

उस्मानाबाद -  येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील  कोरोना मदत केंद्राच्या (War Room) कामकाजास सुरूवात झाली आहे. जिल्हयातील कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हे मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे.जिल्हयातील सर्व  शासकीय  तसेच मान्यता प्राप्त कोरोना रुग्णालयामध्ये रुग्णांना बेडची उपलब्धता तसेच बेड उपलब्ध असलेल्या रुग्णांलयाची नावे, त्यामध्ये विना ऑक्सिजन बेड, ऑक्सिजनसह असलेले बेड,व्हेंटीलेटर बेड, रेमडीसीवीर इंजेक्शन आदीची माहिती या मदत केंद्रातून देण्यात येणार आहे. 

कोरोना रुग्णालयामध्ये ऑक्सिजन पुरवठयासंबधी  समस्या आणि नागरिकांच्या कोरोना संबधी इतर  समस्यांबाबत संपर्क करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.नागरिकांना या हेल्पलाईनवर फोन करून माहिती उपलब्ध  करून घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे  केले आहे.

हेल्पलाईनचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत-
1) 02472-224444 2)02472-225618 3) 02472-226927 आणि 4) 1077
ई-मेल आयडी- Covid19osmwar.room  @gmail.com

या मदत केंद्रात 24X7 अर्थात 24 तास चार कर्मचाऱ्यांच्या शिप्टमध्ये नेमणूक करण्यात आली आहे.नागरिकांना बेड उलब्धतेबाबत, आणि रेमडेसीवीर इंजेक्शनबाबत 24 तास माहिती दिली जाणार आहे.नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर यांनी केले आहे.

From around the web