दिलासा : उस्मानाबाद जिल्ह्यात ११ जून रोजी १२३ कोरोना पॉजिटीव्ह
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज ११ जून (शुक्रवार ) रोजी १२३ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर २३२रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात २ जणांचा मृत्यू झाला तर मागील काही दिवसातील ५ मृत कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे.दिलासा देणारी बातमी म्हणजे ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या एक हजाराच्या आत आली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५६ हजार ६१५ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ५४ हजार ३६० रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १३०९ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ९४६ झाली आहे.
आकडेवारी लपविली
गेल्या १५ दिवसापासून मागील मृत्यूची दररोज किमान ४ ते ६ रुग्णाची नोंद होत आहे. एकीकडे कोरोना रुग्ण दोनशेच्या आत आले असताना, मागील मृत्यू नेमके कुठून येत आहेत , मागील काळात आरोग्य विभागाने मृत्यूचे आकडे लपविले होते का ? असा प्रश्न विचारला जात आहे.