दिलासा : उस्मानाबाद जिल्ह्यात ९ जून रोजी ११९ कोरोना पॉजिटीव्ह

दिवसभरात दोन मृत्यू , मागील काही दिवसातील ६ मृत कोरोना रुग्णाची नोंद 
 
corona
कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ .५३ टक्के तर ‌मृत्यूचे २.२९ प्रमाण टक्के

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज ९ जून (बुधवार) रोजी ११९ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर १७४  रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात दोन जणांचा मृत्यू झाला तर  मागील काही दिवसातील ६  मृत कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. 


उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५६ हजार ३८३ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ५३ हजार ८६६ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १२९५ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १२२२  झाली आहे.

आकडेवारी लपविली 

गेल्या १० दिवसापासून मागील मृत्यूची दररोज किमान ४ ते ६ रुग्णाची नोंद होत आहे. एकीकडे कोरोना रुग्ण दोनशेच्या आत आले असताना, मागील मृत्यू नेमके  कुठून येत आहेत , मागील काळात आरोग्य विभागाने मृत्यूचे आकडे लपविले होते का ? असा प्रश्न विचारला जात आहे. 

From around the web