तेरणा भाड्याने घेण्यास आ. तानाजी सावंत इच्छूक पण जिल्हा बँकेचा अडसर... 

सहा निविदा विकल्या पण शेवटच्या दिवशी आ. सावंत यांचीच निविदा दाखल 
 
d

ढोकी  - मराठवाडयातील सर्वात जुना साखर कारखाना म्हणून नोंद असलेला 'तेरणा'  भाडेतत्वावर देण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे.निविदा दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आमदार तानाजी सावंत यांच्या  भैरवनाथ शुगरने निविदा दाखल केली.केली होती. मात्र जिल्हा बँकेस अपेक्षित असलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीची निविदा दाखल केल्यामुळे त्यांची निविदा नामंजूर करण्यात आली आहे. .त्यामुळे जिल्हा बँक आता  फेरनिविदा काढणार असून, चालू हंगामात कारखाना सुरू हाेण्याची आशा  मावळत आहे.  दुसरीकडे कारखाना भाडेतत्वावर घेण्यासाठी महाराष्ट्रातील उद्योजक पुढे येत नसल्याने बँकेसमोरही प्रश्न निर्माण झाला आहे.

कर्जाच्या गळ्यात रुतलेला आणि भंगार अस्वस्थेत असलेल्या  तेरणा कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी जिल्हा बँकेच्या वतीने निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. वारंवार वाढलेल्या मुदतीत सहा व्यवस्थापनाने निविदा खरेदी केली होती. यात मेयर कमॉडीटीज इ. प्रा लि. मुंबई, ट्व्ेटीवन शुगर्स लि. मुंबई, डिडिएन एसएफए लि. मुंबई, धाराशिव शुगर, सुक्रोग्रीन, पुणे व भैरवनाथ शुगरचा समावेश होता.त्यापैकी निविदा दाखल करण्याच्या शेवटचा दिवस गुरुवारी भैरवनाथ शुगरने निविदा दाखल केली.दाखल केलेली निविदा गुरुवारीच उघडण्यात आली. यामध्ये भैरवनाथ शुगरने जिल्हा बँकेस अपेक्षित असलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीची निविदा दाखल केल्यामुळे त्यांची निविदा मंजूर करण्यात आली नाही. 

तेरणा साखर कारखान्याची निविदा प्रक्रिया नव्याने राबविण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाने लगेचच घेतलेल्या बैठकीत घेतल्याची माहिती बँकेचे कार्यकारी संचालक विजय घोणसे व प्राधिकृत अधिकारी विनोद लावंड यांनी दिली.

कारखान्याच्या निविदा प्रक्रियेत बँकेचा वेळ जात आहे. दोन महिन्यांपासून ही प्रक्रिया सुरू आहे. मात्र राज्यातील कारखानदार किंवा उद्योजकांचा प्रतिसाद कमी असल्याने यातून मार्ग कसा काढायचा असा प्रश्न बँकेसमोरही उपस्थित झाला अाहे. वेळेत प्रक्रिया झाली असती कारखाना चालू हंगामात सुरू झाला असता. दसऱ्यापासून गळीत हंगाम सुरू झाला आहे. प्रक्रियेला अजून वेळ गेला तर यावर्षीही तेरणा पट्ट्यातील ऊस अन्य कारखान्यांना पाठवावा लागेल. दरम्यान बँकेची नियमावली,खार्चिक बाबी, बंद पडलेल्या मशिनरी यामुळे कारखाना सुरू करताना उद्योजकांसमोर अडचणी आहेत.

मराठवाड्यातील पहिला साखर कारखाना म्हणून ओळख असलेला ढोकी येथील  तेरणा शेतकरी साखर कारखाना सन  २०१२ पासून बंद आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेची तेरणाकडे व्याजासह ४२५ कोटी थकबाकी आहे. कारखाना सध्या भंगारअवस्थेत असून हा सुरु करायचा  म्हटलं तर जवळपास ४० ते ५० कोटी खर्च अपेक्षित आहे. ४० ते ५० कोटींमध्ये स्वतःचा खासगी साखर कारखाना उभा राहत असेल तर तेरणा साखर कारखाना भाडेतत्वावर घेण्याचे धाडस कोण करेल ? असा सवाल आहे. 

From around the web