आ. कैलास पाटील यांचा झंझावात
उस्मानाबाद - शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीतून आणि संस्कारातून तसेच राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने राज्यभर सुरू करण्यात आलेल्या शिवसंपर्क अभियानांतर्गत उस्मानाबाद तालुक्यातील सांजा, चिखली, बेंबळी, केशेगाव, उमरेगव्हाण, करजखेडा येथे पंचायत समिती गणातील शिवसैनिक, युवासैनिक, ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधत आ. कैलास पाटील यांनी अडचणी जाणून घेतल्या.
शिवसेना पक्षप्रमुख तथा लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून झालेली आणि होत असलेली विविध विकास कामे समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहचविण्याचे काम संघटित होऊन करण्याचे आवाहन केले तसेच समाजातील विविध घटकांसाठी सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांचा नागरिकांना लाभ मिळावा यासाठी कार्यरत राहण्याचे शाखाप्रमुख, विभागप्रमुख, पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक यांना आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख विजय बापू सस्ते, तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, माजी तालुकाप्रमुख दिलीप जावळे, माजी शहरप्रमुख प्रविण भैय्या कोकाटे, युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अक्षय ढोबळे, युवासेना उपजिल्हाप्रमुख निलेश शिंदे,विजय राठोड, तुळजापूर विधानसभा संघटक पांडुरंग माने,युवा सेना ता.प्रमुख वैभव वीर, शिव अल्पसंख्याक सेनेचे जिल्हाध्यक्ष अमीर शेख, भीमा अण्णा जाधव, शिवसेना कक्ष जिल्हाप्रमुख मोईन खान,उपतालुका प्रमुख किरण चव्हाण, विभागप्रमुख अमोल मुळे, धनंजय इंगळे, सौदागर जगताप, मुकेश पाटील, दिपक पाटील, युवासेना विभागप्रमुख ओंकार आगळे, स्थानिक सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवसैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते.