आ. कैलास पाटील आणि त्यांचा परिवार कोरोना पॉजिटीव्ह 

आ. पाटील यांना दुसऱ्यांना कोरोनाची बाधा 

 
आ. कैलास पाटील आणि त्यांचा परिवार कोरोना पॉजिटीव्ह

उस्मानाबाद : उस्मानाबाद -कळंब मतदारसंघाचे शिवसेना आमदार कैलास घाडगे पाटील यांना  दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा झाली आहे. गेल्यावर्षी त्यांना सप्टेंबर मध्ये कोरोनाची लागन झाली होती. गंभीर बाब म्हणजे त्यांच्या घरातील सर्व सदस्यही कोरोना पॉजिटीव्ह आले आहेत. 

काही दिवसापुर्वी आमदाराचे बंधु अतिष  पाटील  डिस्चार्ज घेऊन आले होते. आता एकाचवेळी घरातील सगळेच सदस्य पाॅझिटिव्ह आल्याने आमदार पाटील यांनीही चाचणी करुन घेतली तेव्हा तेही बाधित असल्याचे अहवालावरुन लक्षात आले.

आमदार घाडगे पाटील यांच्या परिवारातील सगळ्याच सदस्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात वडील बाळासाहेब पाटील व आई दोघांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. पत्नी व मुलगी, भावजय व पुतणी या सुध्दा बाधित असुन ते सर्व डाॅक्टरांच्या सल्ल्याने होम क्वारंटाईन झाले आहेत.

गेल्या काही दिवसामध्ये त्यांनी थेट कोरोना वार्डात जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला होता. आज दिवसभर पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या दाैर्‍यातही ते सहभागी होते. प्रत्येक कार्यक्रमात ते सोबतच होते.

काही दिवसापुर्वीच खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या परिवारातले सगळेच सदस्य पाॅझिटिव्ह आले होते. आता ते यातुन बरे झाल्यानंतर आमदार घाडगे पाटीलही बाधित झाले आहेत.

From around the web