आ. राणा पाटील यांच्या ट्विटला आ. कैलास पाटील यांचे प्रत्युत्तर 

जगाला 'तालिबान' पासून आणि महाराष्ट्राला 'धनुष्यबाण' पासून खरा धोका - आ. राणा पाटील
 
s
धनुष्यबाण हे अर्जुनाचे अस्त्र आहे त्यापासुन फक्त काैरवांना धोका - आ. कैलास पाटील

उस्मानाबाद - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आज दिवसभर राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये राडा पाहावयास मिळत आहे. उस्मानाबादेत शिवसेनेने राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारले तर कळंबमध्ये रस्ता रोको केला. 


दरम्यान , याप्रकरणी नारायण राणे यांना पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केल्यानंतर भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ट्विट करून अटकेचा निषेध केला आहे. 


जगाला 'तालिबान' पासून आणि महाराष्ट्राला 'धनुष्यबाण' पासून खरा धोका आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 


त्याला शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

धनुष्यबाण हे अर्जुनाचे अस्त्र आहे त्यापासुन फक्त काैरवांना धोका ! राज्यात तर १०५ काैरव आहेत. त्याला फक्त धनुष्यबाणच रोखणार! असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

From around the web