टाकळीच्या जिल्हा परिषद शाळेत वर्ग चार, शिक्षक दोन  ... 

 विद्यार्थ्यांची शैक्षणिक हेळसांड 
 
s

टाकळी (बेंबळी )  -  धाराशिव तालुक्यातील टाकळी (बेंबळी )  येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे चार वर्ग आहेत. मात्र या चार  वर्गासाठी दोनच शिक्षक असून,  यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक हेळसांड होत आहे. 

टाकळी(बें) येथील जिल्हा परिषद शाळेतील पहिली  ते चौथी  विद्यार्थ्यांची  संख्या  ११८ इतकी असून या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी फक्त दोन  शिक्षक कार्यरत आहेत.

मागील काही महिन्यांपूर्वी येथील दोन शिक्षकांची  बदली झाली असून त्या जागा जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून  भरल्या गेल्या नाहीत, त्यामुळे येथील शिक्षकांवर अतिरिक्त भार पडत आहेत, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांकडे शिक्षकांचे दुर्लक्ष होत आहे. 

.या सर्व प्रकारामुळे शिक्षक, पालक व शालेय व्यवस्थापण समितीमध्ये खटके उडत आहेत. यापूर्वी शालेय व्यवस्थापण समितीने गटशिक्षणाधिकारी यांच्या कडे टाकळी(बें) येथील जिल्हा परिषद शाळेत कायमस्वरूपी  दोन शिक्षक द्या म्हणून वारंवार मागणी करून ही याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

केंद्रातील उत्कृष्ट शाळा म्हणून पुरस्कार मिळालेली,कनगरा केंद्रातील सर्वात जास्त पटसंख्या असलेली नामांकित शाळा म्हणून टाकळी (बेंबळी ) शाळेचा लौकिक आहे. आज याच शाळेतील विद्यार्थ्यांची प्रशासनाच्या ढिसाळ धोरणामुळे अध्यापनामध्ये मोठ्या प्रमाणात वाताहत होत आहे.

आज रोजी येथील जिल्हा परिषद शाळेची इयत्ता १ ली ते ८ वी या वर्गाची पट संख्या ही 221 इतकी असून उर्दूचे ५० विद्यार्थी व ४ शिक्षक वगळता मराठी माध्यमामधील १ते ७ वी १७१ विद्यार्थ्यांचा भार हा ५ शिक्षकांवर असून त्यामुळे शिक्षक व विद्यार्थी यांच्या मध्ये समन्वय राहत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे येत्या चार दिवसांत जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून  दोन शिक्षक या  शाळेला नाही दिल्यास येथील शाळेला कुलूप लावून जिल्हा परिषद कार्यालयात शाळा भरविण्यात येईल असा इशारा पालक व शालेय व्यवस्थापन  समितीनेदिला आहे.

From around the web