४५ वर्षाच्या पुढील नागरीकांना २१ मे रोजी कोविशिल्ड पहिला तर २२ मे रोजी कोव्हॅक्सीन लसींचा दुसरा डोस मिळणार

३ हजार ९२० डोस उपलब्ध
 
d

उस्मानाबाद -  ४५ वर्षापुढील  २ हजार ६२० नागरिकांना कोविशिल्डचा पहिला डोस दि.२१ मे रोजी ३६ निवडक आरोग्य केंद्रामध्ये देण्यात येणार आहे. तर ४५ वयाच्या पुढील १ हजार ३०९ नागरिकांना दि.२२ मे रोजी कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस ७ आरोग्य केंद्रावर देण्यात येणार आहे. तसेच दोन्ही मिळून ३ हजार ९२० डोस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी दिली.


 दि.२१ मे रोजी जिल्ह्यातील विविध ३६ आरोग्य केंद्रावर लसीकरण करण्यात येणार असून लसीकरण करण्यात येणारी केंद्रे पुढील प्रमाणे आहेत. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील खामगाव, शिंगोली, कामेगाव, दारफळ, बामणी, चिलवडी व घाटंग्री तर तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी, माळुंब्रा, मसला खुर्द, खडकी, तिर्थ खुर्द व देवसिंगा तूळ तसेच उमरगा तालुक्यातील डाळींब, जेकेकुर व एकुरगा तर लोहारा तालुक्यातील भातागळी, हिप्परगा रवा व तोरंबा तर वाशी तालुक्यातील गोजवाडा, कडकनाथवाडी व घाट पिंपरी तसेच भूम तालुक्यातील दुधाडी व ईट व परंडा तालुक्यातील चिंचपुर बुद्रुक, इंगोंदा, कुकडगाव व पिस्तमवाडी या केंद्रावर तसेच उस्मानाबाद येथील वैराग रोडवरील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तर फक्त फ्रन्टलाइन वर्करसाठी पोलीस रुग्णालय उस्मानाबाद. याबरोबरच ग्रामीण रुग्णालय मुरूम, ग्रामीण रुग्णालय लोहारा, ग्रामीण रुग्णालय सास्तूर, ग्रामीण रुग्णालय तेर, ग्रामीण रुग्णालय वाशी, ग्रामीण रुग्णालय भूम, उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर, उपजिल्हा रुग्णालय कळंब, उपजिल्हा रुग्णालय परंडा, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद व जिल्हा शासकीय रुग्णालय उस्मानाबाद या ३६ आरोग्य केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे.

 तर कोव्हॅक्सीन लसीचा पहिला डोस घेऊन २७ दिवस पूर्ण झालेले आहेत. अशा नागरिकांना नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र वैरागड उस्मानाबाद (या केंद्रावर फक्त फ्रन्टलाइन वर्कर साठी लसीकरण करण्यात येणार आहे.) तर इतर नागरिकांना ग्रामीण रुग्णालय ग्रामीण रुग्णालय वाशी, ग्रामीण रुग्णालय तेर, ग्रामीण रुग्णालय मुरुम, ग्रामीण रुग्णालय लोहारा व ग्रामीण रुग्णालय सास्तूर या ७ केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे.

दि.२१ मे रोजी कोविशिल्ड लसीकरण करण्यात येणार असून लसीकरणाची वेळ सकाळ ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे‌. तर दि.२२ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी किंवा बुकिंग करण्याची आवश्यकता नाही. लसीकरण केंद्रावर येताना आधार कार्ड आणणे आवश्यक आहे. तसेच प्रत्यक्ष उपस्थित लाभार्थ्यांपैकी प्रथम आलेल्या लाभार्थ्यांना ऑन स्पॉट नोंदणी पद्धतीने प्रमाणे लसीकरण केले जाणार आहे. 

लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकन वाटप करण्यात येणार आहेत. तसेच लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलिस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणामध्ये मदत करावी. तसेच उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत, शांततेत आणि सुव्यवस्था अबाधित ठेवून लस घ्यावी, असे आवाहन  डॉ. मिटकरी यांनी केले आहे.

From around the web