१४ जून रोजी ४५ वर्षाच्या वरील नागरिकांना मिळणार कोविशील्ड लसीचा डोस 

 
corona las

उस्मानाबाद  - जिल्ह्यातील  ४५ वर्षाच्या वरील नागरिक, आरोग्य कर्मचारी व फ्रन्टलाइन वर्कर यांना कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस दि.१४ जून रोजी दिला जाणार आहे. 

यासाठी जिल्ह्यामध्ये ४४ प्राथमिक आरोग्य केंद्र प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एक गाव असे एकूण ४४ गावे २ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ६ ग्रामीण रुग्णालये, ३ उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद व पोलिस रुग्णालय उस्मानाबाद या ठिकाणी कोविशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. 

    लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपल्या आधार कार्ड सोबत बाळगावे. या दिवशी केवळ ४५ वर्षावरील नागरिकांना तसेच आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाइन वारकऱ्यांना कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहेत तसेच ज्या लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दुसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करु नये 

लसीकरण केंद्र पुढीलप्रमाणे
सर्व ४४ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एक गाव असे एकूण ४४ गावे यासाठी कार्यान्वित करण्यात आलेली आहेत.

ग्रामीण भाग तालुकानिहाय
उस्मानाबाद - येडशी (जागीरदारवाडी )ढोकी (वरुडा ) कोंड (नितळी ) जागजी (भिकार सारोळा ) पाडोळी (मेंढा ) पाटोदा (करजखेडा ) केशेगाव (धारूर ) पोहनेर (गावसुद ) बेंबळी ( मेडसिंगा )समुद्रवाणी (सांगवी )

तुळजापूर - अणदुर (चिवरी ) जळकोट (सिंदगाव ) नळदुर्ग ( मुर्टा ) सावरगाव (वडगाव काटी ) काटगाव (धोत्री ) सलगरा दि  (किलज ) मंगरूळ (कामठा )
उमरगा - मुळज (कराळी ) नाईचाकूर (नारंगवाडी ) येणेगुर (भुसणी ) आलूर (कोथळी ) डिग्गी (बेडगा )

लोहारा - कानेगाव (नागूर )माकणी (खेड ) जेवळी (जेवळी पूर्व तांडा ) आष्टा कासार (भोसगा )

कळंब - शिराढोण (बोरगाव ) येरमाळा (उपळाई ) मोहा (नागझरवाडी ) दहिफळ (शेलगाव  ज ) ईटकुर (बोरगाव ध ) मंगरूळ क ( ढोराळा )

वाशी - पारा ( पिंपळगाव को ) पारगाव (हातोला ) तेरखेडा (वडजी )

भूम - ईट (डोकेवाडी ) पाथरुड (उळूप ) मानकेश्वर (सोनगिरी ) वालवड (गणेगाव ) आंबी (तिंत्रज )

परंडा - आसू (देवगाव ) आनाळा कौडगाव जवळा नि (घारगाव ) शेळगाव (पांढरेवाडी ) वरील सर्व केंद्रावर सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे.

नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र वैराग रोड उस्मानाबाद, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र रामनगर उस्मानाबाद, पोलिस रुग्णालय उस्मानाबाद (केवळ पोलिस आणि न्यायालयीन अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी )

ग्रामीण रुग्णालय मुरूम, लोहारा, सास्तूर, तेर, वाशी आणि भूम 

उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर, परंडा, उमरगा  प्रत्येकी १५० डोस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत तर  शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद (२००) जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद (२००) या ठिकाणी लसीकरणाची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे 

जिल्ह्यामध्ये १४ जून रोजी एकूण १०२ लसीकरण केंद्र कार्यान्वित असणार आहेत लाभार्थ्यांना लस घेण्याकरिता ऑनलाईन नोंदणी अथवा बुकिंग करण्याची आवश्यकता नाही लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित लाभार्थ्यांपैकी प्रथम आलेल्या लाभार्थ्यांना ऑनस्पॉट नोंदणी पद्धतीने लसीकरण केले जाणार आहे लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत या लसीकरण केंद्र ठिकाणी कोविशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा दोन्ही डोस दिले जाणार आहेत. यासाठी या ठिकाणी दोन्ही डोसच्या लाभार्थ्यांनासाठी स्वतंत्र नोंदणी आणि रांगा ठेवण्यात येणार आहेत. तर लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणा मध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविडच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ एच.व्ही. वडगावे व जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी केले आहे.

From around the web