११ जून रोजी ४५ वर्षाच्या वरील नागरिकांना मिळणार कोविशिल्ड लसीचा डोस 

 
corona las

उस्मानाबाद  - जिल्ह्यामध्ये ११ जून रोजी ४५ वर्षाच्या वरील नागरिकांना तसेच आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाइन वर्कर यांना कोविशील्ड लसीचा डोस दिला जाणार आहे ,याकरिता ३० निवडक आरोग्य उपकेंद्रामधून कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार असून २ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र ६ ग्रामीण रुग्णालय ४ उपजिल्हा रुग्णालय ,जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद ,शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद आणि पोलीस रुग्णालय उस्मानाबाद या ठिकाणी कोविशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे 

  लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड सोबत बाळगावे या दिवशी केवळ ४५ वर्षावरील नागरिकांना तसेच आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाइन वर्कर यांना कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे तसेच ज्या लाभार्थ्यांना कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दुसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये 

आरोग्य उपकेंद्र ३० ग्रामीण भाग तालुकानिहाय पुढील प्रमाणे 

  • उस्मानाबाद - किणी, रुईढोकी, कौडगाव, सोनेगाव, कामेगाव, जवळे दुमाला 
  • तुळजापूर - आरळी(बु)कुंभारी, बोरी मसला(खुर्द)गवळेवाडी (वानेवाडी )
  • उमरगा -पेठसांगवी, त्रिकोळी, चिंचोली भुयार,डाळिंब, काळनिंबाळा 
  • लोहारा -लोहारा खुर्द (मोघा खुर्द ) साळेगाव, तावशीगड 
  • कळंब - गौरगाव माळकरंजा जवळा खुर्द हासेगाव (निपाणी) कोथळा (आवाड शिरपुरा) पिंपरी ( शिराढोण ) वाठवडा 
  • वाशी -शेंडी, कन्हेरी 
  • परंडा - कंडारी,पाचपिंपळा, तांदुळवाडी 

नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र वैराग रोड उस्मानाबाद,नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र रामनगर उस्मानाबाद, पोलीस रुग्णालय उस्मानाबाद, ग्रामीण रुग्णालय मुरूम, ग्रामीण रुग्णालय लोहारा, ग्रामीण रुग्णालय सास्तूर, ग्रामीण रुग्णालय तेर, ग्रामीण रुग्णालय वाशी, ग्रामीण रुग्णालय भूम, उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर, उपजिल्हा रुग्णालय कळंब, उपजिल्हा रुग्णालय परंडा, उपजिल्हा रुग्णालय उमरगा, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद, जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद प्रत्येकी २०० डोस उपलब्ध असणार आहेत . 


लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे जिल्ह्यामध्ये ११ जून रोजी एकूण ४५ लसीकरण केंद्र कार्यान्वित असणार आहेत लाभार्थ्यांना लस घेण्याकरिता ऑनलाईन नोंदणी अथवा बुकिंग करण्याची आवश्यकता नाही लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित लाभार्थ्यांपैकी प्रथम आलेल्या लाभार्थ्यांना ऑनस्पॉट नोंदणी पद्धतीने लसीकरण केले जाणार आहे लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे . 

यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकन वाटप करण्यात येणार आहेत ज्या लसीकरण केंद्र ठिकाणी कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा दोन्ही डोस दिले जाणार आहेत अशा ठिकाणी दोन्ही डोसच्या लाभार्थ्यांकरिता स्वतंत्र नोंदणी आणि रांगा ठेवण्यात येणार आहेत लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत नगरपंचायत आणि नगरपालिका व पोलिस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणा मध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविडच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी यांनी केले आहे

From around the web