शिधापत्रिकांसंबंधी दुरुस्तीसाठी उस्मानाबाद तालुक्यात मंडळनिहाय शिबीर

 
s

उस्मानाबाद :-खासदार उस्मानाबाद लोकसभा तथा अध्यक्ष दिशा समिती उस्मानाबाद यांनी दि.15 जुलै-2021 रोजीच्या बैठकीमध्ये शिधापत्रिकासंदर्भात शिबिराचे आयोजन केले आहे.त्यानुषंगाने उस्मानाबाद तालुक्यामध्ये जीर्ण शिधापत्रिका बदलून देणे,विभक्त शिधापत्रिका देणे,शिधापत्रिकेतील नाव कमी करणे आणि नाव समाविष्ट करणे इत्यादी तालुका स्तरावर अर्ज प्रलंबित राहत असल्याने उस्मानाबाद तालुक्यातील मंडळनिहाय दि.09 ते 20 ऑगस्ट 2021 या कालावधीमध्ये शिबीरांचे मंडळनिहाय वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.

अनुषंगाने पुढीलप्रमाणे मंडळनिहाय अधिकारी/ कर्मचारी नियुक्ती करण्यात येत आहे.यासाठी  पुरवठा विभागातील नायब तहसीलदार आर. आय, केलुरकर यांची पर्यवेक्षक आणि अव्वल कारकून एस.डी, बापमारे, यांची सहायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मंडळाचे नाव, मंडळाअंतर्गत येणारी गावे, नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी, ठिकाण, अर्ज स्वीकारण्याची वेळ आणि दिनांक असे:-

उस्मानाबाद शहर,उस्मानाबाद शहर,राघुचीवाडी, पिंपरी सांजा,मंडळ अधिकारी यु.एन.देशपांडे, तलाठी ए.बी.पवार, श्रीमती. ए.डी. निंबाळकर, एस.बी.निंबाळकर,अव्वल कारकून व महसूल सहायक (पुरवठा),सी.के. बारटक्के, टी.बी.कांदे, एस.ए सरगुले, महसूल भवन, तहसील कार्यालय, उस्मानाबाद. दि.09 ऑगस्‍ट 2021 वेळ-सकाळी 10 ते दुपारी 01 वाजेपर्यंत.

उस्मानाबाद ग्रामीण-मेडसिंगा, सकनेवाडी, देवळाली शेकापूर, पळसपवाडी, वडगाव, उत्तमी कायापूर, वरवंटी, पोहनेर, बेगडा, गावसुद, चिलवडी, सुर्डी, झरेगाव मंडळ अधिकारी यु.एन.देशपांडे, तलाठी एम.टी. शिंदे, श्री.डी.पी.कुडवे, श्रीमती. ए.डी. निंबाळकर, श्रीमती ए.ए. नरवडे,अव्वल कारकून व महसूल सहायक (पुरवठा) सी.के. बारटक्के, टी. बी. कांदे, एस.ए सरगुले, महसूल भवन, तहसील कार्यालय उस्मानाबाद. दि.10 ऑगस्‍ट 2021 वेळ- सकाळी 10 ते  दुपारी 01 वाजेपर्यंत.

अंबेजवळगा-अंबेजवळगा भानसगाव,कारी,कौडगाव,खानापूर,घाटंग्री,सोनेगाव,शिंगोली,जहागीदारवाडी,गडदेवदरी, जुनोनी, अंबेहोळ, वलगुड मंडळ अधिकारी ए.बी. तिर्थकर, तलाठी ए.ए. पडवळ, श्री. जी.आर. शिंदे, एम.टी. शिंदे, अव्वल कारकून व महसूल सहायक (पुरवठा), सी.के. बारटक्के, टी.बी.कांदे, एस.ए सरगुले.अंबेजवळगा दि.11 ऑगस्‍ट 2021 वेळ-सकाळी 10 ते दुपारी 01 वाजेपर्यंत.

बेंबळी- आंबेवाडी, बरमगांव बु, कनगरा, बोरखेडा, महालिंगी, पंचगव्हाण, टाकळी, बेंबळी,धुत्ता, मंडळ अधिकारी डी.डी.चिरखे, तलाठी श्री. बी.व्ही. डोके, श्रीमती, ए.डी. निंबाळकर,श्री. बी.के. रोडगे, श्रीमती एम.बी. गाडवे, अव्वल कारकून व महसूल सहायक (पुरवठा), सी.के. बारटक्के, टी.बी.कांदे, एस.ए सरगुले. दि.12 ऑगस्‍ट 2021 वेळ- सकाळी 10 ते दुपारी 01  वाजेपर्यंत.

करजखेडा- करजखेडा, गोगाव, पाटोदा, वडाळा, बरमंगाव खु. ताकविकी, तोरंबा, भंडारी, नांदुर्गा, ककासपुर, विठ्ठलवाडी, महादेववाडी, उमरेगव्हाण, मंडळ अधिकारी डी.डी.चिरखे, तलाठी श्रीमती एस.आर. पाटील, श्री. एस.एस. कानडे, जी.के.कोळी, श्री. बी. व्ही.डोके, अव्वल कारकून व महसूल सहायक (पुरवठा), सी.के. बारटक्के, टी.बी.कांदे, एस.ए सरगुले. दि.13 ऑगस्‍ट 2021 वेळ-सकाळी 10 ते दुपारी 01 वाजेपर्यंत.

केशेगांव-केशेगाव अनसुर्डी,धारुर,वाडीबामणी, बामणी, बावी,कावलदरा, खामसवाडी, रुईभर,गौडगाव, मंडळ अधिकारी व्ही.व्ही.काळे, तलाठी जी.के.कोळी, श्री. ए.डी. निरफळ, श्री.कानडे एस.एस, श्री. एन. आर. गुजर, अव्वल कारकून व महसूल सहायक (पुरवठा), सी.के. बारटक्के,टी.बी.कांदे, एस.ए सरगुले. दि.14 ऑगस्‍ट 2021 वेळ-सकाळी 10 ते  दुपारी 01 वाजेपर्यंत.

पाडोळी- पाडोळी(आ), मेंढा, सारोळा (बु.) बालपीरवाडी, नरसिंगवाडी, चिखली, राजूरी, समुद्रवाणी, लासोना.घुगी, नितळी, येवती, कामेगांव, सांगवी, बोरगावराजे मंडळ अधिकारी डी.एफ. कोळी, तलाठी बी.एस. लाकाळ, श्री.व्ही.व्ही वायचळ श्रीमती एम.बी. गाडवे, एस.जी.जावळे, श्रीमती, सुकेशनी कोंबळे, श्रीमती प्रणिता दराडे, अव्वल कारकून व महसूल सहायक (पुरवठा), सी.के. बारटक्के,टी.बी.कांदे, एस.ए सरगुले. दि.16 ऑगस्‍ट 2021 वेळ-सकाळी 10 ते दुपारी 01 वाजेपर्यंत.

जागजी-भिकारसारोळा,मोहतरवाडी,पानवाडी,सुंभा,तावरजखेडा,टाकळी ढोकी,आरणी,इर्ला,दारफळ,दाऊतपूर,कोंड,जागजी मंडळ अधिकारी डी.एफ कोळी, तलाठी व्ही.बी.ढेकर,आर. एम.कासराळे,श्रीमती पी.सी.मंडगे,बी.एस.लाकाळ, अव्वल कारकून व महसूल सहायक (पुरवठा) सी.के. बारटक्के,टी.बी.कांदे, एस.ए सरगुले. दि.17 ऑगस्‍ट 2021 वेळ-सकाळी 10 ते  दुपारी 01 वाजेपर्यंत.

ढोकी-ढोकी, गोवर्धनवाडी, गोरेवाडी, कावळेवाडी, थोडसरवाडी, कोलेगांव , बुकनवाडी, पळसप,घोगरेवाडी,कसबे तडवळा,कोंबडवाडी,वाखरवाडी,गोपाळवाडी मंडळ अधिकारी एन.डी. नागटिळक, तलाठी व्ही. के. डोके, श्री.एस.के तांबारे, एस. एस. माळी, श्री.एस एस यादव, अव्वल कारकून व महसूल सहायक (पुरवठा) सी.के. बारटक्के,टी.बी.कांदे, एस.ए सरगुले, दि.18 ऑगस्‍ट 2021 वेळ-सकाळी 10 ते दुपारी 01 वाजेपर्यंत.

येडशी-येडशी दुधगावं,जवळा दुमाला खेड, खामगांव, उपळा (मा.), आळणी,कुमाळवाडी, रुईढोकी, तुगांव, भंडाचीवाडी, कौडगाव बावी मंडळ अधिकारी एन.डी. नागटिळक, तलाठी बी.एम. गरड, श्री. एस. जी. पाटील, श्रीमती पी.एस, गोरे, श्री. डी.व्ही.बहिरमल, श्रीमती डी.डी. मुळुक, अव्वल कारकून व महसूल सहायक (पुरवठा) सी.के. बारटक्के,टी.बी.कांदे, एस.ए सरगुले. दि.19 ऑगस्‍ट 2021 वेळ-सकाळी 10 ते दुपारी 01 वाजेपर्यंत.

तेर-तेर हिंगळजवाडी, मुळेवाडी, पवारवाडी, कोळेवाडी, भंडारवाडी, रामवाडी, किणी, वरुडा, बावीढोकी, काजळा, वाणेवाडी, डकवाडी, वाघोली मंडळ अधिकारी ए.बी. तिर्थकर, तलाठी श्री. एस.एम.माळी श्री. आर.आर.बेशकराव, श्री.एस.एस हराळकर, श्रीमती

डी.डी. मुळुक,श्रीमती आर.बी.पाटील, श्री.व्ही व्ही.वायचळ, अव्वल कारकून व महसूल सहायक (पुरवठा) सी.के. बारटक्के,टी.बी.कांदे, एस.ए सरगुले, दि.20 ऑगस्‍ट 2021 वेळ-सकाळी 10 ते दुपारी 01 वाजेपर्यंत.

      नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी  त्या त्या मंडळाअंतर्गत/ सज्जाअंतर्गत रास्त भाव दुकाननिहाय,गावनिहाय या शिबिरांमध्ये जीर्ण झालेल्या शिधापत्रिका बदलून विभक्त शिधापत्रिका देणे, दुय्यम प्रत देणे, तसेच शिधापत्रिकेतील नाव कमी/समावेश करणे इत्यादी कामकाज अचुकपणे नाडावे. तसेच शिबीर कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची तक्रार उद्भवणार नाही याची गांभिर्याने नोंद घ्यावी,असे उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी यांनी आदेश दिले.

From around the web