कोरोना व्हायरसमुळे उस्मानाबादचा उरूस रद्द

 
उस्मानाबाद – जगभर हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसचा फटका उस्मानाबादच्या उरुसाला बसला आहे. येथे  दरवर्षी मोठ्या उत्साहाने पार पडणारा हजरत ख्वाजा शम्सुद्दीन गाज़ी दरगाह यांचा ७१५ वा उरूस यंदा कोरोना  व्हायरसच्या  पार्श्वभूमीवर प्रथमच रद्द करण्यात आला आहे. 
उस्मानाबाद येथे  हिंदू – मुस्लिम ऐक्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या हजरत ख्वाजा शम्सुद्दीन गाज़ी दरगाह यांचा उरूस दरवर्षी मोठ्या उत्सहाने साजरा केला जात होता, यंदा हा उरूस ११ ते १३  मार्च रोजी पार पडणार होता, त्याची जोरदार तयारी सुरु होती, पण कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा उरूस रद्द करण्यात आला आहे. 
उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांनी उरूस रद्द करण्यासाठी हजरत ख्वाजा शम्सुद्दीन गाज़ी दरगाह चे पदाधिकरी तसेच मुस्लीम समाजाची बैठक घेतली, त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. उस्मानाबादेत 715 वर्षांपासून उरुसाची परंपरा सुरु आहे, त्यात आजवर कधीही खंड पडला नव्हता, परंतु प्रथमच कोरोना व्हायरसमुळे उरूस रद्द करण्यात आला आहे. 
 राज्यभरातील मुस्लीम भाविक, तसेच हैद्राबाद , उस्मानाबादेहुन विदेशात गेलेले मुस्लीम बांधव या उरुसासाठी खास उस्मानाबादला येत होते, परंतु यंदा त्यांना उरुसापासून मुकावे लागणार आहे. 



From around the web