राज्यात कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची संख्या ४२४

 
राज्यात कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची संख्या ४२४


मुंबई -  राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवंसेदोवस वाढत चालली आहे. गुरुवारी एका दिवसात राज्यात तब्बल ८८ नवे पॉझिटिव्ह अहवाल आल्याने कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ४२३ वर गेली आहे.

राज्यात आतापर्यंत २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ४२ जण बरे होऊ घरी परतले आहेत. गुरुवारी मुंबई व परिसरात सर्वाधिक म्हणजे ६३ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी मुंबईत ५४, पुण्यात ११, अहमदनगरमध्ये ९, औरंगाबाद २,  उस्मानाबाद २ तर सातारा,, बुलडाणा आणि हिंगोलीतही प्रत्येकी एक नवीन रुग्ण आढळला आहे.

असे आहेत एकूण रुग्ण 

मुंबई २३५, पुणे (शहर व ग्रामीण) ६१, सांगली २५, ठाणे मंडळातील मनपा ४५, नागपूर १६, यवतमाळ ४, अहमदनगर १७, बुलडाणा ५, सातारा, औरंगाबाद प्रत्येकी ३, कोल्हापूर २, उस्मानाबाद २,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, नाशिक, हिंगोली प्रत्येकी १
.

From around the web