काळा बाजार करणाऱ्या सात स्वस्त धान्य दुकानाचे परवाने रद्द
Apr 23, 2020, 22:59 IST
उस्मानाबाद - जिल्ह्यात धान्य वाटपात घोटाळा करणाऱ्या ७ रेशन दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत तर १४ दुकानाचे डिपॉझिट जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. चारुशीला देशमुख यांनी दिली.
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील यु.बी.भांगे, गंधोरा येथील एम.आय.शेख, लोहारा तालुक्यातील आष्टा येथील सुंदराबाई महिला बचत गट यांचे दुकान नंबर २ आणि व्ही.आय.सोलापूरे यांचे दुकान नंबर ३, उमरगा तालुक्यातील मुरूम येथील विकासोचे दुकान, भूम तालुक्यातील तिन्नज येथील लांडे यांचे दुकान परवाने रद्द करण्यात आले आहेत.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत रेशन दुकानात धान्य वाटप
आता दक्षता समिती सदस्य, शासकीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत रेशन दुकानात धान्य वाटप उपस्थितीत रेशन दुकानात धान्य वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी आदेश दिले आहेत.जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानातील वाढत्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना प्रत्येक स्वस्त धान्य दुकानावर दक्षता समिती सदस्य, शिक्षक किंवा अन्य शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती आदेश काढून त्यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना धान्य वाटप करावे, असे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने सर्व तहसिल स्तरावरुन नेमणूक आदेशही निर्गमित झाले आहेत.
सर्व पात्र लाभार्थ्यांना धान्यांचे परिमाण व दर कळावे या उद्देशाने दरफलक दर्शनी भागात लावणेबाबत सूचित केले आहे. तसेच सोशल डिस्टंसिंग ठेवून धान्याचे वाटप करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.गावामध्ये धान्य प्राप्त झाल्यानंतर दक्षता समितीच्या समक्ष पंचनामा करावा.तसेच धान्य गावात पोहोंच झालेबाबत सर्व ग्रामस्थांच्या आणि लाभार्थ्यांच्या निदर्शनास आणावे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने या पूर्वी नियमित कार्यरत असणाऱ्या तीन योजना अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी योजना आणि एपीएल केशरी शेतकरी योजना या व्यतिरिक्त इतर दोन योजना सुरु केल्या आहेत.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो तांदुळ मोफत देण्यात येणार आहे. उर्वरित केशरी शिधापत्रिकाधारक (ज्यांचा समावेश एपीएल केशरी शेतकरी मध्ये झाला नसेल) त्यांना प्रति व्यक्ती 3 किलो गहु 8 रुपये प्रति किलो व 2 किलो तांदुळ 12 रुपये प्रति किलो दराने देय आहे. हे धान्य ज्या लाभार्थ्यांना वितरीत केलेले आहे त्याचे अभिलेखे ठेवणेबाबत सर्व तहसिलदार व दुकानदार यांना आदेशित केलेले आहे. सध्या उस्मानाबाद जिल्हयामध्ये एप्रिल महिन्याचे सर्व योजनांचे धान्य अंत्योदय योजना प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी योजना शेतकरी योजना आणि मोफत तांदुळ जिल्ह्यातील सर्व 1074 दुकानांमध्ये पोहोचलेला असून 92 टक्के लाभार्थ्यां पर्यंत त्याचे वाटप झाले आहे.
जिल्हयामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तक्रारी साठी 9890748855,9970814856,9404421427 हे तीन व्हॉटस्अप क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तसेच Email व प्रत्यक्षातटपालाद्वारे प्राप्त तक्रारींचे तात्काळ निपटारा करण्यात येत आहे. ज्या स्वस्त धान्य दुकानदारांच्या गंभीर स्वरुपाच्या तक्रारी होत्या अशा सहा दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. यामध्ये तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील श्रीमती यु.बी.भोगे, गंधोरा येथील श्री. एम.आय.शेख ,लोहारा तालुक्यातील आष्टा कासार येथील सुंदराबाई महिला बचत गट यांचे दुकान क्रं. 2, व श्री.व्ही.एस. सोलापुरे यांचे दुकान क्रं.3, उमरगा तालुक्यातील मौ. मुरुम येथील चेअरमन विविध कार्यकारी सेवा सोसायटी दुकान क्रं. 2 ,भूम तालुक्यातील मौ. तिंत्रज ता. भूम येथील श्री.एस.एम.लांडे यांचे दुकाने निलंबित करण्यात आलेली आहेत.
तसेच किरकोळ स्वरुपाच्या तक्रारी असलेल्या जिल्ह्यातील 14 रास्त भाव दुकानांचे डिपॉजिट जप्त करण्यात आलेले आहेत. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील 10 दुकानांचा समावेश आहे. तसेच तुळजापूर तालुक्यातील 2, उमरगा तालुक्यातील 1 व परंडा तालुक्यातील 1 दुकानाचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. चारूशीला देशमुख यांनी दिली.