कोरोना :गरज असेल तरच घराबाहेर पडा - जिल्हाधिकारी

 
 कोरोना :गरज असेल तरच घराबाहेर पडा   - जिल्हाधिकारी

उस्मानाबाद-  जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व सर्व नगरपंचायत  क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी शाळा, खाजगी शिकवण्या, कोचींग क्लासेस, अंगणवाडया, महाविदयालये,व आयुक्त, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे यांच्या अस्थापनेवरील शैक्षणीक संस्था, चित्रपटगृहे,/ फिरते चित्रपटगृहे, तरणतलाव, व्यायामशाळा, नाटयगृहे, म्युझियम, इ. दि-31 मार्च 2020 पर्यत बंद ठेवण्यास आदेश देण्यात आले असून सर्वसामान्य नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी  दीपा मुधोळ मुंडे यांनी केली आहे.

जिल्हाधिकारी तथा अघ्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थाापन प्राधिकरणाच्या वतीने आवाहन करण्यांत येते की सार्वजनिक आरोग्य विभाग (साथरोग अधिनियम-1897 खंड-2)अधिसूच नेनुसार महाराष्ट्र शासनाने राज्यात करोना विषाणुमुळे (COVID-19) उदभवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे.

संसर्गजन्य रोगाचा प्रतीबंध व नियंत्रण यासाठी “महाराष्ट्र कोव्हीड-19” उपाययोजना नियम-2020 प्रसिघ्द केले असुन यातील नियम क्र.3 नुसार जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे. कोव्हीड-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी जिल्हाधिकारी  सक्षम असतील असे जाहिर केले आहे. 

         जिल्हयांत आपत्ती  व्यवस्थापन कायदा-2005 लागु करण्यांत आला आहे. व राज्यांत साथरोग प्रतिबंधात्मक कायदा -1897 अंतर्गत अमलबावणी सुरु करण्यांत आली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या विभागात अंतर्गत आरोग्य पथके तयार करून 24 तास कर्यरत आहेत. जिल्हा रुग्णालयात उपजिल्हा रुग्णालय, ग्रामिण रुग्णालय या ठीकाणी आयसोलेटेड वॉर्ड तयार केले आहे. औषधे व साधनसामुग्री अपलब्ध आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी  शहरातील सर्व  खाजगी डॉक्टरांची आय.एम.ए. मार्फत  कार्यशाळा घेण्यांत आली आहे.

          जिल्हा रुग्णालयांत (सिव्हील हॉस्पीटल) येथे नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे.ते 24X7 तंज्ञ कर्मचाऱ्यासह कार्यरत आहे. याचा नंबर-02472-226927 हा आहे. नोडल ऑफीसर म्हणून डॉ.डी.के.पाटील अति.जिल्हा शल्य चिकीत्सक मो.नं.-94224996580 स्थानिक व्यवस्था पाहतील  व अंतर्गत संस्थांची व्यवस्था डॉ.सचिन बोडके मो.क्र.-9405236480 हे पाहतील. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष-,02472-225618 क्रमांकावर संपर्क साधू शकता. वरील प्रमाणे क्रमांकावर आवश्यकती माहिती दिली जाईल.   सर्व प्रशासकीय अधिकारी, नगर परिषद / नगर पंचायत मुख्याधिकारी यांनी  अपले वॉर्ड, ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतीचा परीसर,  अधिकारी–कर्मचारी यांनी शहरीभागापासून ते गावापर्यत सर्व परीसर तसेच आपल्या अधिनस्त असणारी कार्यालये, स्वच्छतागृहे इ. स्वच्छ ठेवावीत त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार वेळोवेळी फवारणी करण्याबाबत निर्देश देण्यांत आले आहेत.

     सर्व नागरिकांना आव्हान आहे की गरजेनुसारच घराच्या बाहेर पडा, आपला परिसर आपले घर स्वच्छ व निरजंतूक ठेवा. शिंकताना खोकताना रुमालाचा वापर करा. नागरीकांनी एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी उस्मानाबाद जिल्हयांत सामाजिक, सांस्कृतीक ,राजकीय, धार्मिक, क्रिडाविषयक कार्यक्रमांना तसेच मेळावे यात्रा, विविध प्रकारची प्रदर्शने इत्यादी कार्यक्रमांना परवानगी देता येणार नाही या पुर्वी दिले असल्यास ते रदद करण्यांत येते.

        उस्मानाबाद जिल्हयांत सर्व नगरपालिका व नगर पंचायत क्षेत्रातील 10 वी व 12 वी च्या परीक्षा तसेच विश्वविद्यालयाच्या परीक्षा विहीत वेळापत्राकानुसार घेण्यांत येणार आहे. तसेच आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्याच्या संपर्कात येणार नाहीत या साठी आवश्यक ती दक्षता व खबरदारी घेण्याच्या सुचना संबंधित संस्था प्रमुखांना देण्यात आलेली आहे.

घाबरु नका योग्य सल्ला व माहिती घ्या. आवश्यकतेनुसार उपाय अंमलात आणा व सुरक्षीत रहा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

From around the web