उस्मानाबादच्या नामांतराला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पाठींबा 

 
उस्मानाबादच्या नामांतराला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पाठींबा

मुंबई - CMOMaharashtra या अधिकृत फेसबुक  पेजवर आणि   ट्विटर हँडलवरून उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव करण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबादच्या नामांतराला पाठींबा दिला आहे, हे स्पष्ट होते.  मात्र यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ची भूमिका काय राहील, याकडे लक्ष वेधले आहे. 


मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून औरंगाबाद शहराचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आल्यानंतर  प्रचंड गदारोळही झाला होता. आता पुन्हा एकदा या नामांतराच्या मुद्द्याला फोडणी मिळालीय. CMO कडून उस्मानाबाद शहराचा उल्लेख धाराशीव असा करण्यात आलाय. विशेष म्हणजे CMO ने ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचा फोटो आहे. अमित देशमुख हे काँग्रेसचे नेते असल्यानं काँग्रेसला हे मान्य आहे का?, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

‘धाराशिव-उस्मानाबाद येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याला संलग्न 430 खाटांचे रुग्णालय निर्माण करणे,’ असं सीएमओनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यावरून आता काँग्रेसची कोंडी झालीय.

उस्मानाबादचं  नामांतर हायकोर्टमध्ये अडकलं 

१९९५ मध्ये युती शासन सर्वप्रथम सत्तेवर आल्यानंतर तत्त्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी, उस्मानाबादच्या नामांतराला पाठींबा देवून मंत्रिमंडळ बैठकीत उस्मानाबादचे 'धाराशिव' नामांतराचा ठराव मंजूर करून घेतला होता, त्यानंतर नामांतर विरोधी लोकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून नामांतर ठरावास स्थगिती मिळविली होती. 

त्यानंतर २५ वर्षानंतर पुन्हा एकदा उस्मानाबादच्या नामांतराची मागणी जोर धरू लागली आहे. शिवसेनाचा नामांतरास पाठींबा असला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका विरोधात आहे. 

From around the web