चार गाव पाणीपुरवठा योजना : पोलीसांना गुंगारा देत तेरणा धरणात जलसमाधी आंदोलन

 
s

तेर -  धाराशिव तालुक्यातील तेरणा मध्यम प्रकल्पातून गेली अनेक वर्षांपासून बंद असलेली चार गाव पाणीपुरवठा योजना तातडीने चालू करावी यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष व आम आदमी पक्षाच्या वतीने  शनिवार दि.26 रोजी जलसमाधी आंदोलन करण्यात आले.पोलीसांचा डोळा चुकवत गुंगारा   देत गणिमी कावा करून  हे आंदोलन यशस्वी करण्यात आंदोलनकर्ते यशस्वी ठरले  . 

तेरणा धरणातून  तेर,ढोकी ,येडशी,तडवळा या गावासाठी 2006 पासून  चार गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू  होती परंतु  ही योजना प्रचंड नुकसानीत गेल्याने महावितरणची वीज बिलापोटी  कोट्यावधी रूपयांची थकबाकी मुळे ही योजना बंद पडली होती.

ही योजना तातडीने चालू करावी म्हणून 1 आँगस्ट रोजी राष्ट्रीय समाज पक्ष व आम आदमी पक्षाच्या वतीने जलसमाधी करण्याचा इशारा दिला होता.परंतु प्रशासणाने याची दखल न घेतल्याने  शनिवार दि.26 रोजी तेरणा धरणाच्या जलाशयात जलसमाधी करण्याचा निर्णय घेतला होता.

s

धरणाच्या अलीकडच्या बाजूने पदाधिकाऱ्यांनी जलाशयात उड्या घेतल्या आपत्तीव्यवस्थापन दलाच्या जवाणांनी आंदोलनकर्त्याना बाहेर काढले.यावेळी आपचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी पिंपळे, राजपाल देशमुख तालुका उपाध्यक्ष, दत्ता कांबळे तालुका सचिव, बबलू पवार तालुका अध्यक्ष आदिवासी सेल,आकाश वाकुरे ढोकी शहर उपाध्यक्ष, नासिर कुरेशी, केशव सलगर ,तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष बालाजी वगरे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद कुलकर्णी,युवक जिल्हाध्यक्ष आण्णा बंडगर,जिल्हा कार्यकारणी सदस्य तालुका अध्यक्ष सचिन देवकते,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य धनाजी आंधळे राष्ट्रीय समाज पार्टी, तालुका उपाध्यक्ष सतीश डोलारे, सोमनाथ धायगुडे,  पवन माने, विजय वैद्य, शिवाजी पडुळकर, आप्पा पडुळकर, रमाकांत लकडे आदीं उपस्थित होते

s

दरम्यान सुकाणू समितीने  दिलेल्या आश्वासनानुसार निधी उपलब्ध करून दिल्यानंतर पाणीपुरवठा योजना  दुरुस्ती करून चालू करण्यात येईल असे लेखी आश्वासन जि.प.पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आल्यानंतर आंदोलन संपले 


यावेळी आपचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी पिंपळे व रासपचे तालुका अध्यक्ष सचीन देवकते यांनी धरणात पाणी असतानाही प्रशासन जाणूनबुजून पाणी चालू करीत घाण पाण्यामुळे आरोग्यावर परिमाण होत आहे.लोकप्रतिनिधी,ग्रामपंचायत ,जिल्हा प्रशासन यांच्या निषेधार्ह घोषणा देण्यात आल्या


जि.प.ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे प्र.कार्यकारी अभियंता मिलिंद देशपांडे,प्राधीकरणचे उपविभागीय अभियंता रमेश ढवळे ,स.पो.नि.जगदीश राऊत, ,अप्पर तहसीलदार निलेश काकडे,मंडळ आधिकारी अनील तिर्थकर   ग्रामविकास अधिकारी  प्रशांत नाईकवाडी आदी आधिकारी घटनास्थळी  ठाण मांडून  होते
. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दल.व ढोकी पोलिसांनी धरणावर चोख बंदोबस्त तैनात केला होता

From around the web