उस्मानाबाद जिल्ह्यातील ६८ गावाच्या सीमा बंद

१० पेक्षा अधिक कोरोना रुग्ण निघाल्यास गावाच्या सीमा सील
 
उस्मानाबाद जिल्ह्यातील ६८ गावाच्या सीमा बंद
१७३ गावांमध्ये पाच पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळले 

उस्मानाबाद -  उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कडक पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील १७३ गावांमध्ये पाच पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळले असून ६८ गावामध्ये १० पेक्षा अधिक रुग्ण संख्या आहे. १० पेक्षा अधिक रुग्ण निघाल्यास गावाच्या सीमा सील करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

उस्मानाबाद जिल्ह्यात १४ एप्रिल २०२१ रोजी रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१पर्यंतच्या कालावधीसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत त्यामुळे नागरिकांनी केवळ अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडणे अपेक्षित आहे जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असली तरीही नागरिक अत्यावश्यक सेवा बरोबर सूट देण्यात आलेल्या बाबींचे कारण नमूद करून मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असून संचारबंदीचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असून मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. 

सद्यस्थितीत उस्मानाबाद जिल्ह्यात १७३ गावांमध्ये पाच पेक्षा जास्त कोविड बाधित रुग्ण आढळले आहेत त्यामुळे सर्व उपविभागीय दंडाधिकारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या हद्दीत ज्या गावांमध्ये १० पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत अशा ६८ गावातील सीमा बंद करून फौजदारी प्रक्रिया आहे १९७३ चे कलम १४४ नुसार त्या भागात जाण्यास मनाई केली आहे व सदर ठिकाणी जनता कर्फ्यू लागू केला आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील उपरोक्त १७३ गावांमध्ये कंटेनमेंट प्लॅनची कडक अंमलबजावणी करण्यात येत असून त्या गावांमध्ये माझे कुटुंब माझे जबाबदारी ही मोहीम प्राधान्याने राबविण्यात येत आहे या गावाची संलग्न आसणारे प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय यांनी सतर्क राहणे बाबत कळवले आहे सदरील गावातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आल्यास तात्काळ जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात जाऊन तपासणी करावी व आजार अंगावर काढू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यामधील माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची माहिती अशी 
( दि 24 एप्रिल 2021 )  

1)एकूण लोकसंख्या  = 16 76 662
2)आत्तापर्यंत सर्वेक्षण झालेली लोकसंख्या = 499222
3) एकूण कुटुंब संख्या = 345677
4) आत्तापर्यंत सर्वेक्षण झालेले कुटुंब संख्या = 106304
5) स्थापन केलेली  पथके =1140
6) कर्मचारी = 2908
7) सर्वेक्षणामध्ये आतापर्यंत आढळून आलेली संशयित रुग्ण संख्या= 1884

SARI = 121
ILI. = 385
Covid.= 293
Other = 1076

8) आतापर्यंत आढळून आलेले एकूण  Comorbid रुग्ण संख्या =14204

From around the web