तुळजाभवानी मातेच्या दरबारात भाजपचा शंखनाद 

 
s

तुळजापूर -  भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी  राज्यभर  शंखनाद आंदोलन करण्यात आले. तुळजापुरात आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली शंखनाद करण्यात आला. 

 आई तुळजाभवानी मंदिरासमोर शंखनाद आंदोलन व काळ्या कपड्याची गुढी उभारून असंवेदनशील ठाकरे सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी मंदिर उघडण्याच्या प्रतिक्षेत असणाऱ्या बंधू भगिनींशी चर्चा करताना त्यांचा भावनाविवशतेचा अनुभव आला, असे आ. आना जगजितसिंह पाटील यांनी सांगितले. 

राज्य सरकारचे धोरण अनाकलनीय आहे. गर्दी होणारे व्यवसाय, सभा, बार, कार्यक्रम, वाहतूक व्यवस्था, इतर अनेक विषयांना परवानगी मिळते पण योग्य ती काळजी घेऊन सहज सुरू करता येणारे, लाखोंचा उदरनिर्वाह असणारे धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात येतात. ठाकरे सरकारचे ‘बेगडी हिंदुत्व‘ आता जनतेच्या लक्षात आले आहे.

धार्मिक स्थळांवर अवलंबून असलेले सर्वसामान्य कर्मचारी, पुजारी, लघु व्यवसायिकांची तीव्र नाराजी शंखनाद आंदोलनावेळी पुढे आली. राज्य शासनाने या संदर्भात तात्काळ, सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,असा इशारा आ. पाटील यांनी यावेळी दिला. 

From around the web