भाजपच्या अध्यामिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांच्यावर तुळजापुरात गुन्हा दाखल
कोविड संदर्भाने जारी केलेले आदेश झुगारु मंदीर प्रवेश केला म्हणून गुन्हा दाखल
Updated: Oct 8, 2021, 20:17 IST
तुळजापूर : मंदिरे उघडा म्हणून आंदोलन करणारे भाजपच्या अध्यामिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी तुळजाभवानी मंदिर उघडताच, पास न काढता भक्तांच्या अगोदर सहकुटुंब दर्शन घेतले म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभुमीवर नवरात्रोत्सव संदर्भात श्री तुळजाभवानी मंदीरात प्रवेशासाठी विविध मनाई आदेश जारी केले आहेत. ते मनाई आदेश झुगारुन नाशिक येथील आचार्य तुषार भोसले यांसह अन्य लोकांनी दि. 07 ऑक्टोबर रोजी 11.58 ते 12.30 दरम्यान श्री. तुळजाभवानी मंदीरात जाउन दर्शन घेतले. यावरुन तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर चे सहायक व्यवस्थापक- . प्रविण अमृतराव यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 109, 188, 269 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.