उस्मानाबाद जनता सहकारी विकास पॅनलला भाजप सेनेचा पाठिंबा - मोदाणी

नागदे - मोदाणी पॅनलचा विजय निश्चित 
 
s

उस्मानाबाद - उस्मानाबाद जनता सहकारी बँक ही सर्वसामान्यांची बँक असून या बँकेच्या विकासाचा आलेख उंचावत राहिलेला आहे. सध्या सुरू असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मोदाणी यांच्या नेतृत्वाखाली व वसंत नागदे यांच्या मार्गदर्शनाखाली नागदे-मोदाणी पुरस्कृत उस्मानाबाद जनता बँक विकास पॅनल उभा करण्यात आला आहे. या पॅनलमध्ये सर्व पक्षांच्या मंडळींचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे या पॅनलला भाजप व शिवसेना या पक्षाचा पाठिंबा असल्याचे ठाम प्रतिपादन विद्यमान चेअरमन ब्रिजलाल मोदाणी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.११ नोव्हेंबर रोजी केले.  

उस्मानाबाद येथील हॉटेल पुष्पक पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी वसंतराव नागदे, व्हाईस चेअरमन वैजीनाथराव शिंदे, माजी चेअरमन विश्वासराव शिंदे, आशिष मोदाणी, तानाजी चव्हाण, सुभाष गोविंदपूरकर, प्रदीप पाटील, निवृत्ती भोसले, सुभाष धनुरे, नंदकुमार नागदे, राजीव पाटील, हरीश सूर्यवंशी, करुणा पाटील व पंकजा पाटील आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना मोदाणी म्हणाले की, मी स्वखुशीने सेवानिवृत्ती घेतली असून शेवटच्या श्वासापर्यंत बँक चालविणार असल्याचे सांगत त्यांनी मी बँकेच्या चेअरमनपदाची सूत्रे स्विकारली त्यावर्षी बँकेला ९ कोटी रुपयांचा नफा झाला होता. तर आज ४० कोटी १८ लाख रुपये बँक नफ्यात असून बँकेचा कारभार रिझर्व बँकेच्या नियमानुसार सुरळीत व अतिशय पारदर्शीपणे सुरू आहे. या संचालक मंडळाच्या निवडणुकीची मुदत संपल्यामुळे ती निवडणुकीक घ्यावी यासाठी जिल्हा उपनिबंधक यांना बँकेच्यावतीने पत्राद्वारे मागणी केली होती. मात्र मुदतवाढ देण्यासाठी आम्ही मागणी केली नसल्याचे त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे खासगी पद्धतीने आम्ही निवडणूक लावली असती. परंतू आम्ही इतर कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब केला नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच मी ११ वर्ष चेअरमनपदावर राहिलो असून मी बँकेचे सभासद, संचालक, खातेदार व कर्मचारी यांच्या हितासाठी कायद्याच्या चौकटीत राहूनच व सर्वांना विश्वासात घेऊन योग्य निर्णय घेतले. तर त्या निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला असल्याचे त्यांनी नमूद केले. 

 व्हाईस चेअरमन वैजनाथराव शिंदे म्हणाले की, २०१०-११ साली बँकेच्या कारभाराची सूत्रे हाती घेतल्यापासून या बँकेच्या प्रगतीचा आलेख खूप वाढला आहे. या बँकेच्या माध्यमातून जिल्ह्याचे नाव परराज्यात उंचावण्याचे काम संचालक व कर्मचारी यांच्या माध्यमातून झाले आहे. तसेच या बँकेच्या उस्मानाबादसह सोलापूर लातूर बीड अहमदनगर व कर्नाटक राज्यातील बिदर या जिल्ह्यात ३० शाखा आहेत. त्यामुळे ही बँक मराठवाड्यातील अग्रगण्य अशी ही बँक असून या बँकेचे ७३ लाख ४५४ सभासद असून चार लाख ६५ हजार खातेदार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच विश्वासराव शिंदे म्हणाले की, या बँकेने कोअर बँकिंग कार्यप्रणाली अंमलात आणली असून या बँकेची २ डेटा सेंटर असून स्वमालकीची कार्यालय देखील आहेत. तसेच कुरूळा रोगाचा प्रतिबंध व नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य देखील केलेले आहे. विशेष म्हणजे बँकेच्या सभासदांनी आमच्यावर दाखविलेला विश्वास व त्या विश्वासास पात्र राहून आम्ही सर्व संचालक मंडळाच्या समन्वयाने बँकेच्या विकासाच्या व हिताच्या दृष्टीने धोरणात्मक बदल घडवून मागील दहा वर्षापासून ३ पट्टीपेक्षा जास्त प्रगती साध्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे २०२१-२६ साठी निवडणुकीत उभ्या असलेल्या नागदे-मोदाणी यांनी पुरस्कृत पॅनेलच्या सर्व उमेदवारांच्या कपबशी या चिन्हावर मतदारांनी आपले मत देऊन विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

From around the web