भूमच्या लाचखोर उपविभागीय अधिकारी मनिषा राशिनकर यांना ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी

 
s

भूम - भूमच्या लाचखोर उपविभागीय अधिकारी मनिषा राशिनकर यांच्यासह कोतवालास ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, राशिनकर यांच्या भूम आणि अहमदनगर येथील घरावर लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने छापेमारी करून काही रक्कम जप्त केली आहे. 

परंडा तालुक्यातील जेकटेवाडी येथील वाळू वाहतूक करणाऱ्या ठेकेदारास त्याचे  एक टीप्पर व त्याच्या पाहुण्यांचा जे.सी.बी.व तीन ट्रॅक्टर  हे विना कारवाई  वाळू वाहतुकीसाठी चालू देण्यासाठी आरोपी क्रमांक १ श्रीमती मनिषा अरुण राशिनकर ( वय 45 वर्षे,उप विभागीय अधिकारी,भूम )   व आरोपी क्रमांक  2 विलास नरसींग जानकर ( वय 32 वर्षे, कोतवाल, देवळाली सज्जा प्रती नियुक्ती  उप विभागिय अधिकारी कार्यालय भुम वर्ग 4 )  यांनी तक्रारदार याच्याकडे प्रती महिना 1,10,000/- रुपये लाच मागणी करून तडजोडी अंती 90,000/- लाच मागुन त्यापैकी 20,000/- रुपये लाच आरोपी क्र.2 हस्ते स्वीकारल्याने त्यांच्या विरुद्ध पो.स्टे.भुम येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या दोन्ही आरोपीना आज भूम न्यायालयात उभे करण्यात आले असता, न्यायालायने ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, राशिनकर यांच्या भूम आणि अहमदनगर येथील घरावर लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने छापेमारी करून काही रक्कम जप्त केली आहे. याबाबत अधिक माहिती दोन दिवसांत  देण्यात येईल, असे लाच लुचपत प्रतिबंधक पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

From around the web