परंडा : खुनाच्या गुन्ह्यात तिघांना आजन्म कारावासाची शिक्षा

 
परंडा  : खुनाच्या गुन्ह्यात तिघांना  आजन्म कारावासाची शिक्षा


परंडा  :  भूम - परंडा भागात  येथे गाजलेल्या एका खून प्रकरणी तीन आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 


परंडा पो.ठा. गु.र.क्र. 112 / 2014 या हा खुनाच्या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक-  एच.बी. वाकडे यांनी करुन आरोपी- 1) मंगेश मल्लीकार्जुन बोराडे उर्फ बाळु, वय 38 वर्षे 2) नवनाथ बळीराम बोराडे, वय 27 वर्षे 3) समाधान अंबऋषी बोराडे वय 33 वर्षे, तीघे रा. सावरगांव, ता. भुम यांच्यासह 10 आरोपींविरुध्द् भुम सत्र न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते.


या सत्र खटला क्र. 173 / 2014 ची सुनावणी भुम सत्र न्यायालय क्र. 2 मा. श्री उत्पात यांच्या न्यायालयात सुरु होती. यात अभियोग पक्षातर्फे ॲडव्होकेट श्री. के.डी. कोळपे यांनी बाजु मांडली. या खटल्याचा निकाल आज दि. 29.09.2020 रोजी जाहीर होउन  न्यायालयाने उपरोक्त तीन आरोपींस भा.दं.सं. कलम- 302, 34 च्या अपराधाबद्दल दोषी ठरवून आजन्म सश्रम कारावासासह प्रत्येकी 10,000 ₹ दंडाची शिक्षा सुनावून अन्य 6 व्यक्तींची निर्दोष मुक्तता केली आहे. तसेच तीन्ही आरोपींनी दंड भरल्यास त्यातील अर्धी रक्कम ही या गुन्ह्याच्या तक्रारदारास नुकसान भरपाई म्हणुन देण्याचा आदेश केला आहे. 

टकले खून प्रकरणी आजन्म कारावास 

भूम तालुक्यातील गाजलेल्या अमोल टकले खून खटल्यातील तीन आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अमोल टकले हा जय हनुमान संघटनेचा कार्यकर्ता होता. याप्रकरणात भूम नगर पालिकेचे गटनेते तथा भाजप नेते संजय गाढवे यांच्यासह ७ जणांची निर्दोष सुटका झाली आहे. 


१६ सप्टेंबर २०१४ रोजी भूम तालुक्यातील सावरगाव येथे जुन्या वादातून हाणामारी झाली होती.या घटनेत टकले (३२) यांचा तलवारीने खून करण्यात आला.परंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक एच.बी. वाकडे यांनी करुन आरोपी मंगेश मल्लीकार्जुन बोराडे उर्फ बाळु (३८), नवनाथ बळीराम बोराडे (२७), समाधान अंबऋषी बोराडे (३३, तिघे रा. सावरगांव) यांच्यासह संजय गाढवे व १० आरोपींविरुध्द भूम सत्र न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते.

From around the web