भारत बंद : उस्मानाबाद जिल्हा मोटार मालक महासंघाने चक्काजाम आंदोलन

 
भारत बंद : उस्मानाबाद जिल्हा मोटार मालक महासंघाने चक्काजाम आंदोलन

उस्मानाबाद - केंद्र सरकारने लागू केलेले शेतकरी विरोधी तीन कायदे मागे घ्यावेत या मागण्यासाठी भारत बंदची हाक देण्यात आली असून या या बंदला  येथील उस्मानाबाद जिल्हा मोटर मालक महासंघाच्यावतीने सक्रिय सहभाग नोंदवत चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

अन्यायकारक शेतकरी विरोधी तीन विधेयके पारित करून त्याचे कायद्यात रूपांतर कोणत्याही शेतकरी संघटनेला अथवा विरोधी पक्ष नेत्यांना विचारात न घेता मनमानीपणे मोदी सरकारने तो कायदा लागू केला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार असून यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असून ते कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीमध्ये गेल्या १३ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे मात्र सरकारने याबाबत कोणतेच पाऊल उचलले नसल्यामुळे संपूर्ण देशात बंदची हाक देण्यात आली. 

या बंदला उस्मानाबाद जिल्हा मोटार मालक महासंघाचे जिल्हाध्यक्ष मोईनोद्दीन पठाण व जिल्हा उपाध्यक्ष आयुब  रुस्तुम कुरेशी यांच्या नेतृत्वात ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या बॅनरखाली जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन केले. तर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी अजीम ताजुद्दीन शेख, सादिक हारून रशिद शेख, जाकिर हारूनखान पठाण, अब्दुल गफार शेख, सरफराज शेख, अलीम शेख, उस्मान शेख, सलीम पठाण, हबीब शेख, मुख्तार शेख, निजाम शेख, शेख म. अली, खुर्शिद शेख व ऐतेशाम शेख आदीसह संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

From around the web