बेंबळी पोलिसांकडून वाहन चालकांची लूट ( व्हिडीओ ) 

 
s

बेंबळी - सध्या लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनचे नियम तोडणाऱ्या वाहन चालकांकडून नियमानुसार दंड आकारून पावती दिली तर कुणाची तक्रार नाही, पण पावती न देता ते पैसे खिशात घालणे, ही  लूटच म्हणावी लागेल, ही  लूट सुरु केली आहे, बेंबळी पोलिसांनी... 

तुळजापूर - औसा या चार पदरी महामार्गावर उजनी फाट्याजवळ बेंबळी पोलिसांनी  मंडप मारून वाहन चालकाची लूट सुरु केली आहे, त्याचा  सबळ पुरावा उस्मानाबाद लाइव्हच्या हाती लागला आहे.  

व्हिडीओ मधील पोलीस नेताजी जगताप हा इतर पोलिसांना म्हणतो, मी कसं २०० घेतो. जास्त मागायचे आणि जेवढे देईल तेवढे घ्यायचे ...  तुम्हाला  कसं  ड्युटी करताना इंटरेस्ट येईना..  

हे स्टिंग ऑपरेशन सामाजिक कार्यकर्ते  बाळासाहेब सुभेदार यांनी केले आहे.  

उजनी फाट्याजवळ जी लूट सुरु आहे, त्याला बेंबळी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा आशीर्वाद आहे आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे त्यावर कसलेही नियंत्रण नाही, असा आरोप सुभेदार यांनी केला आहे.

व्हिडीओ पाहा  

From around the web