नूतन वर्षाचे स्वागत करताना कोरोनाचे भान ठेवा 

- प्रभारी पोलीस अधीक्षक नवनित काँवत
 
s

उस्मानाबाद  -  नूतन  वर्षाचे स्वागत करताना कोरोनाचे भान ठेवा, असे आवाहन प्रभारी पोलीस अधीक्षक नवनित काँवत यांनी केले आहे. 

   उद्या दि. 31.12.2021 रोजी सरत्या वर्षाला निरोप देउन नुतन वर्षाचे स्वागत केले जाणार असून त्या निमीत्त अनेकांनी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कोविड- 19 चा संसर्ग आटोक्यात यावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचे विविध मनाई आदेश अंमलात असून नववर्ष आरंभाच्या पार्श्वभूमीवर दि. 29.12.2021 रोजीच्या परिपत्रकान्वये मार्गदर्शक सुचना निर्गमीत करण्यात आल्या आहेत. त्यानुसार दि. 25.12.2021 रोजी पासून रात्री 09.00 ते सकाळी 06.00 वा. दरम्यान 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई केली आहे. त्यासोबतच बंदीस्त सभागृहात आसन क्षमतेच्या 50 % तर खुल्याजागी 25 % व्यक्तींची मर्यादा घालण्यात आली आहे.

            सध्या कोविड- 19 च्या ओमायक्रॉन या उप प्रकाराने संसर्ग अधिक गतीने पसरत आहे. याचे भान ठेउन जनतेने पुरेसे सामाजिक अंतर राखने, गर्दी टाळने, मास्क- सॅनिटायझरचा वापर करावा. बालकांनी व ज्येष्ठ नागरिकांनी गर्दीची ठिकाणे टाळावीत तसेच एकंदरीत सर्वांनीच सामाजिक कार्यक्रम टाळून घरगुती स्वरुपात नुतन वर्षाचे स्वागत करावे. असे आवाहन प्रभारी पोलीस अधीक्षक नवनित काँवत यांनी जनतेस केले आहे.

From around the web