बाळासाहेब सुभेदार यांना राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार प्रदान
उस्मानाबाद - उस्मानाबाद येथील सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांना पुण्यात भटक्या विमुक्त जमाती आयोगाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष दादा इदाते यांच्या हस्ते ईगल फौंडेशनचा राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ईगल फौंडेशनच्या वतीने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , औद्योगिक क्षेत्रात अतुलनीय आणि कौस्तुकास्पद काम करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार दिला जातो. यंदाच्या पुरस्कारसाठी उस्मानाबाद येथील सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांची निवड करण्यात आली होती.
कोथरूड ( पुणे ) एमआयटी विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहात भटक्या विमुक्त जमाती आयोगाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष दादा इदाते यांच्या हस्ते सुभेदार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी ईगल फौंडेशनचे संस्थापक विलासराव कोळेकर, एमआयटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ कराड, डॉ, महेश थोरवे आदी उपस्थित होते.
सुभेदार यांना यापूर्वी पुणे येथील सजग नागरिक मंचच्या वतीने देण्यात येणारा सजग नागरिक माहिती अधिकार पुरस्कार हरियाणा सरकारचे प्रधान सचिव अशोक खेमका यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.