स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त जिल्ह्यात  संविधान व कायद्याबाबत जागृती करणार

- न्या .एम .आर .नेरलेकर
 
s

 उस्मानाबाद-  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने पुढील पंचेचाळीस दिवस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील सहाशे ग्रामपंचायत , सर्व पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफिस , कारागृह येथे संविधान आणि कायद्यांबाबत जागरूकता अभियान राबविण्यात येणार आहे. या अभिनव उपक्रमामुळे नागरिकांना आणि कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना त्यांच्या अधिकारांबाबत माहिती होईल अशी माहिती दिली जाईल, असे येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम.आर. नेरलेकर यांनी आज येथे सांगितले. 

d

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित रॅलीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे सदस्य मिलिंद पाटील , डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय उस्मानाबाद येथील प्रा. डॉ.संजय आंबेकर, जिल्हा शासकीय अभियोक्ता शरद जाधवर , जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष नितीन भोसले,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव वसंत यादव,पोलीस निरीक्षक तानाजी दराडे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरवातीला महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.    

  समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने गेल्या पंचवीस वर्षांपासून सातत्याने केले आहे. आज महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून या अभियानाचा शुभारंभ करण्यात येत असल्याचे श्री.नेरलेकर म्हणाले.

d

तत्पूर्वी जिल्हा विधी सेवा प्राधकरणाचे सचिव श्री.यादव यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात या अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली .ते म्हणाले संपूर्ण देशात असे कार्यक्रमांतर्गत नागरिकांमध्ये देशातील कायद्यांचे पालन करण्याबाबत प्रबोधन केले जाणार आहे . उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जाऊन वकील आणि विधीज्ञ लोकन्यायालाचे महत्व समजावून विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाची सेवा कशा प्रकारे घ्यावी याबाबत मार्गदर्शन करतील.अन्यायास वाचा फोडण्यासाठी प्राधिकरणाचे अधिकारी तत्पर राहणार आहेत आणि लोकांनीही विधी सेवा प्राधिकरणाचे अवलंब करून आपल्या आयुषयातील वाद संपवावे असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

d

श्री. मिलिंद पाटील म्हणाले की देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सारखे वकील आणि विधी सेवेतील महापुरूषांचे मोठे योगदान आहे. तसेच भारताच्या इतिहासातील सर्वात चांगली न्यायव्यवस्था छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात होती. जगातील सर्वात महान विधिज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचे संविधान तयार करण्याचे महत्त्वाचे योगदान दिले. या रॅलीत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यामुळे आपणही शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांच्या आदर्श आदर्श पुढे ठेवून आपले आयुष्य यशस्वीरित्या जगावे असेही ते यावेळी म्हणाले.

डॉ.संजय आंबेकर यांनीही  मनोगत व्यक्त केले, ते म्हणाले देशातील नागरिकांना विधी व कायद्यांबाबत जागरूक करणे हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कारण बऱ्याच वेळी कायद्यांबाबत माहिती नसल्यामुळे लोकांवर अन्याय होत असतो. त्यामुळे कायद्यातील काही प्रमुख बाबी त्यांच्यासमोर मांडणे आणि नागरिकांना कुठल्या गोष्टी कायद्याच्या विपरीत आहेत याबाबत शिक्षण देणे महत्त्वाचे आहे. म्हणून सर्व विधी तज्ज्ञांनी आपल्या अवतीभवती असलेल्या नागरिकांचे प्रबोधन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

d

आज सकाळी १० वाजता जिल्हा न्यायालयाच्या मुख्य द्वारापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक तुळजाभवानी स्टेडियम पासून परत जिल्हा न्यायालयाचे मुख्य द्वाराजवळ असे रॅलीचे आयोजन करण्यात आले.

From around the web