औरंगाबाद पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर

 


राष्ट्रवादीचे आ. सतीश चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला 

 औरंगाबाद पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर


उस्मानाबाद - विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या मतदार संघाची निवडणूक १ डिसेंबर तर मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सतिश चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. 


या निवडणुकीसाठी अधिसूचना ५ नोव्हेंबर रोजी जारी  होणार आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची शेवटची तारीख १२  नोव्हेंबर, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख १७  नोव्हेंबर, मतदान १ डिसेंबर तर मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे. 


या  मतदारसंघाचे विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आहेत. राष्ट्रवादी,काँग्रेस आणि शिवसेना यांची आघाडी असल्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना आपला उमेदवार उभा करणार की  आघाडी धर्म पाळणार, याकडे लक्ष वेधले आहे. तसेच भाजपकडून अनेक नावे चर्चिले जात असली तरी प्रवीण घुगे,शिरीष बोराळकर, रमेश पोकळे यांची  नावे  आघाडीवर आहेत. 

From around the web