खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या अंगावर टिप्पर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न
धाराशिव - शिवसेनेच्या ठाकरे गटाचे फायर ब्रँड नेते खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या अंगावर टिप्पर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ८ जून रोजी झाला होता. त्यानंतर पोलिसांनी चालकास ताब्यात घेऊन सोडून दिले होते. त्याच्या बातम्या धाराशिव लाइव्हसह माध्यमात येताच, पोलिसांनी चार दिवसांनतर खुलासा केला आहे तसेच खा. ओमराजे निंबाळकर यांनी देखील तक्रार दिली आहे.
हा खुलासा असा आहे की, पोलीस ठाणे ढोकी: दि.08.06.2023 रोजी माहिती मिळाली की, लोकसभा सदस्य उस्मानाबाद ओमप्रकाश भुपालसिंह ऊर्फ पवणराजे निंबाळकर यांना दि.08.06.2023 रोजी सकाळी 08.30 वा. चे . सुमारास गोवर्धनवाडी शिवारात तेर जाणारे रोडवर आगतराव लोमटे यांचे शेताचे बाजूला वॉकींग करत घराकडे परत येत असताना टिप्पर चालकाने त्याचे ताब्यातील टिप्पर भरधाव वेगाने त्यांचे अंगावर घालण्याचा प्रयत्न केला व तो पळून गेला आहे. अशी प्राथमिक माहिती मिळाली होती. त्यावरुन पोलीस स्टेशन ढोकी येथील पोलीस स्टाफ ने तात्काळ जावून गावर्धनवाडी येथे रेल्वे क्रॉसिंग गेटजवळ जाऊन तेथील लोकांचे गर्दीतुन टिप्पर क्र. एमएच 44 के 8844 त्याचा चालक रामेश्वर बंडू कांबळे रा. अंबेजोगाई जि. बीड यास ताब्यात घेवून पोलीस स्टेशन ढोकी येथे आणले. सदर प्रकरणाचे वेगवेगळ्या सर्वबाजूने बारकाईने चौकशी केली व सर्व बाबींची खात्री केली.
तदनंतर ओमप्रकाश भुपालसिंह ऊर्फ पवनराजे निंबाळकर यांनी दि.08.06.2023 रोजी खालील प्रमाणे तक्रार दिली. मी सकाळी 7.00 वा. व्यायामासाठी गोवर्धनवाडी ते तेर रोडवर गेलो. मी व्यायाम करुन वॉकींग करत रोडचे उजवे बाजूने परम गोवर्धनवाडी येथे येत असताना सीड फार्म जवळील आगतराव लोमटेयांचे शेताचे बाजूला 8.32 वा. चे. सुमारास आलो. त्यावेळी माझे पाठीमागून वाहनाचा आवाज आल्याने मी पाठीमाबील बाजूस पाहीले तर एक टिप्पर भरधाव वेगात आलेले होते. व टिप्पर चालकाच्या हातात मोबाईल होता. टिप्परचा चालक त्याची डावी बाजू सोडून मी चालत असलेले उजवे बाजूने येत असल्याने मी रोडचे खाली बाजूला उडी मारली. त्यावेळी तेथुन पुढे गेलेले टिप्परचा नंबर पाहिला असता टिप्परचा नंबर टिप्पर क्र. एमएच 44 के 8844 होता. टिप्पर चालक याने त्याचे ताब्यातील टिप्पर भरधाव वेगात हयगय व निष्काळजी पणे रोडचे उजवे बाजूस चालवून माझे जिवीतास धोका निमार्ण केला. व टिप्पर न थांबता तसेच भरधाव वेगात पुढे गेले. असे दिलेल्या तक्रारीवरुन गु.र.नं. 215/2023 कलम 279, 336 भा.द.सं. सह 184 मोटर वाहन कायदा प्श्रमाणे गून्हा दाखल आहे.सदर गुन्ह्याचा तपास आमचे व प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन ढोकी यांचे अधिपत्याखाली सफौ/816 सातपुते हे करत आहेत.