टाकळी येथे अटल भूजलचे काम बोगस

पाणी जिरवण्या ऐवजी जिरवला जातोय शासनाचा पैसा
 
s
संबंधित ठेकेदाराला कोणाची साथ?

टाकळी (बेंबळी ) -  धाराशिव तालुक्यातील टाकळी (बेंबळी )  येथे केंद्र शासनाची अत्यंत महत्त्वाची आणि  लोक उपयुक्त अटल भूजल योजना राबविली जात आहे. मात्र संबंधित ठेकेदार कडून सर्व  अटी व नियम धाब्यावर  ठेवून बोरमध्ये पाणी जिरवण्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने बोगस आणि निकृष्ट काम केले जात आहे.

टाकळी (बेंबळी )  हे पाणी टंचाईग्रस्त गाव असून येथील भूजल पातळी खालावल्याने  हे गाव केंद्र शासनाच्या महत्वकांक्षी अटल भूजल योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून गावात पावसाळ्यामध्ये  सखल भागात पाणी साचते त्या ठिकाणी, वाहता नाला, नदी यामध्ये पाणी जिरवण्या साठी एकूण ५० बोर घेण्यात आले, 

ह्या बोर ची खोली 150 फूट  घेणे गरजचे असताना काही ठिकाणी कमी खोली करण्यात आली आहे,त्याच बरोबर यातील जवळपास २५ बोर हे ज्या ठिकाणी पाणीच साचत नाही अश्या उंच ठिकाणी घेण्यात आले आहेत, आणि या बोरच्या चारी बाजूनी दोन बाय दोन चा खड्डा  घेणे अपेक्षित असताना हे खड्डे मात्र ओबडधोबड पध्दतीने घेतले असून त्या खड्ड्यात दगडी सोलिंग टाकण्या ऐवजी मुरुम टाकला आहे. 

त्यामुळे हे पाणी जिरवण्या ऐवजी ठेकेदार शासनाचे पैसे जिरवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. गावातील अटल भूजल चे काम हे निकृष्ठ आणि बोगस होत असल्याचे येथील सरपंच राहुल मसाळ, उपसरपंच दत्तात्रय सोनटक्के , सदस्य प्रशांत सोनटक्के यांच्या लक्षात येताच त्यांनी संबंधित विभागाचे अभियंता श्री. गायकवाड यांना पंचनामा करणेसाठी गावात बोलवले असता काही वेळेच्या आत संबंधित ठेकेदार व कामगार काम करता करता नजर चुकवून पळून गेले त्यामुळे संबंधित ठेकेदाराला कोणाचे अभय आहे असा प्रश्न पडला आहे.

येथील ग्रामपंचायतने संबंधित अभियंता यांना हे झालेल्या काम एकदम निकृष्ट आणि बोगस झाले असल्याचे लक्षात आणून दिले होते. तरी पण ग्रामपंचायतच्या कोणत्याही सदस्याला अथवा गावकऱ्यांना कल्पना न देता परत बोगस काम केले जात आहे.

संबंधित ठेकेदार विरोधात लेखी तक्रार करणार

अटल भूजल योजनेतुन ग्रामपंचायतने सांगेल त्या ठिकाणी 50 बोर घेण्याचे ठरले होते,मात्र संबंधित ठेकेदाराने आम्हाला न जुमानता त्याला वाटेल त्या ठिकाणी बोर घेतले, त्यामुळे हे काम पूर्णतः बोगस आणि निकृष्ट झाले आहे, आम्ही संबंधित ठेकेदार विरोधात जिल्हाधिकारी यांना पत्र देणार आहोत., संबंधित ठेकेदार विरोधात योग्य ती कारवाई करण्यात यावी व अटल भूजल योजनेचे काम हे १०० टक्के योग्य पध्दतीने करण्यात यावे अशी मागणी करणार आहोत.
 - सरपंच मसाळ

From around the web