प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर देखील 18 ते 44 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांसाठी कोविड लसीकरण सत्र होणार सुरु

11 मे 2021 रोजी चे कोविड लसीकरण केंद्र पाहा  
 
प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर देखील 18 ते 44 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांसाठी कोविड लसीकरण सत्र होणार सुरु

उस्मानाबाद  - दिनांक 1 मे 2021 पासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांकरिता कोविड  लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे.  सुरुवातीला उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पाच ठिकाणी याकरिता लसीकरण सत्र सुरू करण्यात आलेत आणि नंतर हळूहळू संख्या वाढवत ते अकरा ठिकाणी ज्यामध्ये जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय येथे सध्या सुरू आहे. आता हेच लसीकरण ग्रामीण भागातील नागरिकांकरिता देखील सुरू करणे करिता नियोजन करण्यात आले असून यामध्ये दिनांक 13 मे 2021 रोजी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हे लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे.


या लसीकरण सत्रांमधून केवळ त्याच लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे ज्यांनी त्या लसीकरण सत्रासाठी ऑनलाइन पद्धतीने cowin.gov.in वर नोंदणी करून संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राचा लसीकरण सत्राचा स्लॉट बुकिंग केलेला आहे. याव्यतिरिक्त इतर लाभार्थ्यांना या लसीकरण सत्रामध्ये लस दिली जाणार नाही. त्यामुळे दिनांक 13 मे 2021 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर असणार्‍या लसीकरण केंद्रांवर ज्यांनी स्लॉट बुक केलेला नाही अशा नागरिकांनी जाऊन गर्दी करू नये.

या लसीकरण केंद्रावर आयोजित होणाऱ्या लसीकरण सत्राचे ऑनलाईन बुकिंग करिता चे स्लॉट उद्या दिनांक 11 मे 2021 रोजी दुपारी बाराच्या सुमारास खुले केले जाणार आहेत. तरी नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने स्लॉट बुकिंग करावे आणि त्यानुसार मोबाईलवर लसीकरण शेडूल झाले आहे असा मॅसेज प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांनी दिनांक 13 मे 2021 रोजी दिलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला जाऊन लस घ्यावी.

11 मे 2021 रोजी चे कोविड लसीकरण केंद्र 

आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर आणि 45 वर्षावरील नागरिक यांच्यासाठी कोविशिल्ड लसीकरण केंद्र ठिकाणे ( सकाळी 9 ते दु.12 वेळेत दुसरा डोस देय असणाऱ्या लाभार्थ्यांना प्राधान्य आणि दु. 12 नंतर पहिला व दुसरा दोन्ही डोस करिता) - शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र खिरणी मळा आणि शाहू नगर उस्मानाबाद, पोलीस रुग्णालय उस्मानाबाद आणि चिंचोळी हॉस्पिटल उमरगा ( उप. जि. रू. उमरगा अंतर्गत मोफत)

 कोविन पोर्टलवर ऑनलाईन  स्लॉट बुकींग केलेल्या 18-44 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांसाठी चे लसीकरण केंद्रे - जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद, उपजिल्हा रुग्णालय उमरगा, तुळजापूर, कळंब, परांडा, ग्रामीण रुग्णालय लोहारा, वाशी, भूम, तेर, सास्तूर आणि मुरूम

From around the web